UP Train Accident – रेल्वे क्रॉसिंग तोडून ट्रॅकवर पोहचला डंपर, मालगाडीची धडक, सहा तास वाहतूक विस्कळीत

UP Train Accident – रेल्वे क्रॉसिंग तोडून ट्रॅकवर पोहचला डंपर, मालगाडीची धडक, सहा तास वाहतूक विस्कळीत

उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये मंगळवारी अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. निहालगड स्थानकाजवळ एक डंपर थेट रेल्वेचे फाटक तोडून रेल्वे रुळावर गेला आणि अडकला. याचदरम्यान मालगाडी आली आणि डंपर धडक देत 100 मीटर फरफटत नेले. या अपघातामुळे मालगाडीचे इंजिन बिघडल्याने सहा तास मालगाडी ट्रॅकवर खोळंबली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र डंपरचा क्लीनर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निहालगड रेल्वे स्थानकावरून मालगाडी येणार असल्याचा सिग्नल मिळाल्यानंतर पूर शोहरत रेल्वे क्रॉसिंगचे गेटमन आनंद हर्षवर्धन गेट बंद करत होते. क्रॉसिंग बंद झाल्यानंतर रायबरेलीहून अयोध्येकडे जाणारा एक डंपर क्रॉसिंग बूम तोडत थेट रेल्वे ट्रॅकवर येऊन धडकला. गेटमनने ट्रॅकवर डंपर पाहताच क्रॉसिंग पूर्णपणे बंद केले.

क्रॉसिंग बंद झाल्यावर डंपर चालकाने डंपर डाउन रेल्वे लाईनच्या बाजूला उभा केला आणि गेटमनला क्रॉसिंग उघडण्यास सांगितले. मात्र गेटमनने त्याच्याकडे दुर्लक्ष करत तेथून पळ काढला. इतक्यात मालगाडी आली आणि डंपरला धडक देत 100 मीटर फरफटत घेऊन गेली.

या अपघातात डंपर आणि मालगाडीचे इंजिन तसेच ओची, इलेक्ट्रिक लाईन, पोल, बॅरिकेडिंग, वायर इत्यादी वस्तूंचे नुकसान झाले. अपघातामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. सुमारे सहा तासांनी दुसरे इंजिन जोडून मालगाडी रवाना करण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जळगावच्या चोपडा एसटी बसस्थानकात गुजरात पॅटर्न, बसपोर्टच्या धर्तीवर विकास जळगावच्या चोपडा एसटी बसस्थानकात गुजरात पॅटर्न, बसपोर्टच्या धर्तीवर विकास
राज्यातील एसटी स्थानकांचा बीओटी ( बांधा वापरा आणि हस्तांतरित करा) तत्वावर विकास करण्यात येणार आहे. यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार...
Boat Drowned – भाविकांची धरणात बोट बुडाली; 7 भाविक बेपत्ता, 8 जणांना सुखरुप वाचवले
हजारो लोकं अश्रू ढाळताहेत…! बिल्डरांकडून होणाऱ्या फसवणुकीवर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
तेव्हा एकनाथ शिंदे मोदींच्या डस्टबिनमध्ये होते; उद्धव ठाकरे यांचा सणसणीत टोला
मुख्यमंत्री म्हणाले नागपूर दंगल पूर्वनियोजित; सोशल मीडियावर ‘चल दंगल समजून घेऊ’ कविता पुन्हा चर्चेत
Buldhana News – पाडकाम करताना घर अंगावर कोसळलं, बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू
गुहागरच्या खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात बोगस प्रवेश अन् करोडोंचा गैरव्यवहार, भास्कर जाधव यांचा खळबळजनक आरोप