Pratik Babbar- स्मिता पाटील यांचा लेक भावुक, आईच्या आवडत्या घरात प्रतीक बब्बरने केलं लग्न
अभिनेत्री स्मिता पाटील यांची ओळख सांगण्याची गरज नाही. एकेकाळी स्मिता पाटील यांच्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्रासह भारताला वेड लावले होते. त्यांचा आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक हा देखील सध्याच्या घडीला अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. प्रतीक पाटील बब्बर याने नुकतेच लग्न केले. परंतु लग्नाच्या एका महिन्यानंतर, प्रतीक बब्बर आणि प्रिया बॅनर्जी या दोघांनी त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून प्रतीकच्या दिवंगत आई स्मिता पाटील यांना भावनिक श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
प्रतीक आणि प्रिया यांचे लग्न १४ फेब्रुवारी २०२५ रोजी स्मिता पाटील यांच्या मुंबईतील रॉक क्लिफ या राहत्या घरी झाले. यामध्ये केवळ जवळचे नातेवाईक या लग्नसोहळ्यासाठी उपस्थित होते. विशेष म्हणजे, प्रतीकचे वडील राज बब्बर आणि सावत्र भावंडे आर्य बब्बर आणि जुही बब्बर हे मात्र या समारंभाला उपस्थित नव्हते. जवळचा मित्र परीवार मात्र या लग्नासाठी आवर्जून उपस्थित होता.
प्रतीकच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधूनच प्रतीक याने विवाहासाठी हे ठिकाण का निवडले याची माहिती दिली. लग्नाच्या ठिकाणाबद्दल बोलताना प्रतीक म्हणाला, ‘आई लग्नाआधी माझ्या स्वप्नात आली होती. त्या स्वप्नामध्ये आईने मला सांगितलं होतं की, आपण ज्या घरात राहतो तिथेच लग्न करावं’. प्रतीक बब्बर याला लग्नाच्या ठिकाणाबद्दल दृष्टांत हा स्मिता पाटील यांनी दिला होता, त्यामुळेच प्रतीकने हा लग्नसोहळा स्मिता पाटील यांनी स्वप्नात दिलेल्या दृष्टांतानुसार करण्याचे ठरवले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List