विधान परिषदेची उमेदवारी डावलल्याने भाजपमध्ये धुसफुस, प्रादेशिक समतोल साधण्याऐवजी फडणवीस यांनी केले स्वत:च्या समर्थकांचे पुनर्वसन

विधान परिषदेची उमेदवारी डावलल्याने भाजपमध्ये धुसफुस, प्रादेशिक समतोल साधण्याऐवजी फडणवीस यांनी केले स्वत:च्या समर्थकांचे पुनर्वसन

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत तीन जागा भाजपच्या वाटय़ाला आल्या. या जागेवर उमेदवारी मिळविण्यासाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. दादाराव केचे, अमर राजूरकर आणि माधव भंडारी यांच्या नावांची चर्चा होती, मात्र ऐनवेळी राजूरकर आणि भंडारी यांना डावलून फडणवीस समर्थकांची विधान परिषदेवर वर्णी लावण्यात आल्याने भाजपमध्ये आता धुसफुस सुरू झाली आहे.

भाजपकडून विधान परिषदेसाठी इच्छुक असलेल्या 20 जणांची यादी प्रादेशिक समतोल साधत तयार करण्यात आली होती. यामध्ये विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काहीजणांची नावे होती, मात्र उमेदवाराची नावे अंतिम करताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विदर्भाला झुकते माप देत संदीप जोशी आणि दादाराव केचे यांना उमेदवारी देण्यात आली. संदीप जोशी यांना नागपूर पदवीधरमधून याआधी उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला, तर फडणवीसांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे यांच्यासाठी दादाराव केचे यांचे विधानसभेचे तिकीट कापण्यात आले. त्याबदल्यात त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आल्याने फडणवीस विरोधी गटात कमालीची अस्वस्थता आहे.

निष्ठावंतांच्या नाराजीमुळे राजूरकरांचा पत्ता कट

अमर राजूरकर हे अशोक चव्हाणांसोबत भाजपमध्ये आले. त्यांच्या उमेदवारीसाठी चव्हाण यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती, मात्र नांदेड जिह्यातील भाजपच्या निष्ठावंत गटाने राजूरकर यांच्या नावाला विरोध केला. अनेक वर्षांपासून पक्षात काम करणाऱ्या कार्यकत्यांना संधी देण्यात यावी असा आग्रह जिह्यातील नेत्यांनी धरला होता. त्यातच अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यावर लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये चिखलीकर यांचा झालेला पराभव, त्यापाठोपाठ लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने पक्षश्रेष्ठींच्या नाराजीमुळे अशोक चव्हाण समर्थक राजूरकर यांना संधी नाकारून भाजप निष्ठावंत संजय केनेकर यांना उमेदवारी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

भंडारी यांना थांबण्याचा सल्ला

विधान परिषद असो की राज्यसभा, माधव भंडारी यांच्या नावाची चर्चा दरवेळी उमेदवार म्हणून असते, पण अंतिम यादीत त्यांचे नाव कधीच येत नाही. भंडारी यांना याखेपेस उमेदवारी मिळेल असा शब्द देण्यात आला होता. दिल्लीला पाठविलेल्या यादीत त्यांचे नावदेखील होते, मात्र फडणवीस समर्थक जोशी यांच्यासाठी भंडारी यांना थांबण्याचा सल्ला देण्यात आल्याची चर्चा आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

निर्मात्याने अभिनेत्रीच्या प्रायव्हेट पार्टला मारलं, जबडा तोडला…, ऐकताच ऐश्वर्या रायने घेतला मोठा निर्णय निर्मात्याने अभिनेत्रीच्या प्रायव्हेट पार्टला मारलं, जबडा तोडला…, ऐकताच ऐश्वर्या रायने घेतला मोठा निर्णय
एक दिवस त्याने मला प्रचंड मारलं… त्याने माझा जबजा तोडला… तो थांबला नाही… माझ्या प्रायव्हेट पार्टला त्याने मारलं आणि माझ्याकडून...
खास लोकाग्रहास्तव स्टार प्रवाहच्या मालिकेत परत येतेय प्रेक्षकांची आवडती नायिका
गौरीसोबत आमिर खानच्या रिलेशनशिपबद्दल विक्रम भट्ट स्पष्टच म्हणाला..
एक्स गर्लफ्रेंडसोबत ‘टाइमपास करत होतो’ म्हटल्यानंतर आदर जैनची सारवासारव
प्रसिद्ध कॉमेडियनला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, अल्पवयीन मुलीवर बलात्कार
कचऱ्याचे ढीग, भीषण पाणीटंचाई, ट्रॅफिक जाम; घोडबंदरवासीयांची तिहेरी कोंडी! मूलभूत सोयीसुविधा देण्यास ठाणे महापालिका सपशेल फेल
पोलीस डायरी – पोलिसांनो, गुलाम नको, ‘सिंघम’ व्हा!