Men Facial- पुरुषांनी फेशियल का करायला हवं! वाचा पुरुषांनी फेशियल करण्याचे फायदे!

Men Facial- पुरुषांनी फेशियल का करायला हवं! वाचा पुरुषांनी फेशियल करण्याचे फायदे!

सजणं सवरणं हा स्त्रियांचा आवडीचा प्रांत. पण आता पुरुषही स्वतःच्या सौंदर्याबाबत सजग होऊ लागले आहेत. त्यामुळेच सध्याच्या घडीला पुरुषही सलोनमध्ये जाऊन स्वतःचे चांगलेच लाड पुरवून घेताना दिसतात. असं म्हणतात की, सौंदर्याच्या बाबतीमध्ये पुरुषांचं ज्ञान हे फार कमी असतं. परंतु सध्याच्या घडीला मात्र काळ बदलत चालला आहे. पुरुषही आता सजग होऊ लागला आहे. त्यामुळेच अलीकडे आपल्याला पुरुषही बिनदिक्कतपणे फेशियल करताना दिसत आहेत.

 

साधारणपणे, चमकदार आणि सुंदर चेहरा हवा असल्यास फेशियल करणं हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. सध्याच्या युगात तर तुम्हाला अपटूडेट राहणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळेच महिलाच नाही तर पुरुषही फेशियलला खूप महत्त्व देऊ लागले आहेत. पुरुष शेव्हिंग केल्यानंतर फेशियल करू शकतात. दाढी करणे हा पुरुषांच्या दिनचर्येचा एक भाग आहे. साधारणतः आठवड्यातून एकदा पुरुष दाढी करतात. पुरुषांनो तुम्ही चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी फेशियल करण्याचा विचार करत असाल, तर शेव्हिंग केल्यानंतर फेशियल करणं हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

 

शेव्हिंग केल्यानंतर फेशियल करण्याचे फायदे

शेव्हिंग केल्यानंतर फेशियल केल्याने त्वचेचे रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे चेहरा नैसर्गिकरित्या चमकू लागतोच पण त्वचेचा रंगही उजळतो.

फेशियलमुळे चेहऱ्यावरील डाग आणि काळे चट्टेही दूर होण्यास मदत होते.

फेशियल केल्यामुळे पुरुषांचा चेहरा स्वच्छ होण्यास मदत होते.

 

शरीर आणि मनावरील ताण कमी करण्यासाठी फेशियल हा खूप उत्तम उपाय मानला जातो.

फेशियल केल्यामुळे चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळेच त्वचा अधिक टवटवीत दिसू लागते.

फेशियल केल्यामुळे व्हाईटहेड्स आणि ब्लॅकहेड्स निघून जातात.

नियमित फेशियल केल्याने त्वचा निरोगी आणि अधिक तरुण दिसू लागते.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

…तेथे बांधकाम सुरु होते त्यामुळे त्यांच्या हल्ल्याची धार वाढली, नागपूर पोलिसांनी सांगितला सगळा घटनाक्रम …तेथे बांधकाम सुरु होते त्यामुळे त्यांच्या हल्ल्याची धार वाढली, नागपूर पोलिसांनी सांगितला सगळा घटनाक्रम
नागपूर हे निसर्गाचे वरदान असणारे टुमदार शहर काल सुर्यास्तानंतर दगडफेक आणि जेसीबी वाहनांच्या धुराने अचानक वेढले. दोन्ही बाजूंनी जमावाने घोषणाबाजी...
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर लोटांगण घातले? कोणी केला आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
कुणी तरी येऊन सांगितलं… चला हिंदूंना मारायला… मुस्लमानांना…; किरण मानेची नागपूर दंगलीवरून टीका
Ratnagiri News – पर्यटकांसाठी करमणुकीची नवी मेजवानी! थिबा पॅलेस येथे मल्टिमीडिया शो सुरू
रसगुल्ला खाताच जमिनीवर कोसळला आणि मरण पावला, काय घडलं नेमकं?
छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला; अटक होण्याची शक्यता
रत्नागिरी जिल्ह्यात यंदा 357 गावातील 722 वाड्यांमध्ये पाणीटंचाईची शक्यता; संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार