नागपुरात नेमकं काय घडलं… फडणवीसांनी सांगितलं
नागपुरातील महाल परिसरात सोमवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने ‘औरंगजेबाची कबर हटाव’ असे नारे देत आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी गवताच्या पेंडय़ा असलेली प्रतीकात्मक कबर जाळली. त्या प्रतीकात्मक कबरीवरील कापडावर धार्मिक मजकूर होता अशा अफवेनंतर दंगल उसळली असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. नमाज आटोपून येत असलेल्या 200 ते 250 लोकांच्या जमावाने नारेबाजी सुरू केली, आग लावून टाकू, अशी हिंसक भाषा त्यांनी सुरू केल्याने पोलिसांनी बळाचा वापर केला, असे त्यांनी सांगितले.
हंसापुरी भागात 200 ते 300 लोकांच्या जमावाने हातात काठय़ा घेऊन दगडफेक केली. त्यांच्या तोंडावर फडकी गुंडाळली होती. त्या जमावाने हंसापुरीत 12 दुचाकाRचे नुकसान केले. तसेच काही लोकांवर घातक शस्त्रांनी हल्ला केला, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सायंकाळी भालदारपुरा भागात 80 ते 100 लोकांच्या जमावाने पोलिसांवर हल्ला केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुर आणि सौम्य बळाचा वापर केला. जमावाने एक व्रेन आणि काही चारचाकी वाहने जाळली. त्या घटनेत तीन पोलीस उपायुक्तांसह 33 पोलीस जखमी झाले. एका पोलीस उपायुक्तावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. पाच नागरिक या हिंसाचारात जखमी झाले. यापैकी तिघांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. दोन जण रुग्णालयात आहेत, त्यापैकी एकजण आयसीयूमध्ये आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नागपूर शहरात एसआरपीएफच्या पाच तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस प्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधून पुढील सूचना दिलेल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले.
काही दिवस शांत बसा; नीतेश राणेंना मुख्यमंत्र्यांची तंबी
भाजपचे मंत्री नीतेश राणे वक्तव्य करताना विशिष्ट समाजाला टार्गेट करीत असल्यामुळे हिंसाचार वाढल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नीतेश राणे यांना आपल्या दालनात बोलावून, ‘काही दिवस शांत बसा’, अशी तंबी दिल्याची माहिती समोर आली आहे.
नागपूर दंगल ही सरकार पुरस्कृत मनोज जरांगे यांची टीका
नागपूर दंगल ही सरकार पुरस्कृत असून पुढील काही दिवसांमध्ये होणाऱ्या पालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका जिंकण्यासाठी दोन समाजांना झुंजवायचे उद्योग करण्यात येत असल्याची टीका मराठा आरक्षणाचे प्रणेते मनोज जरांगे-पाटील यांनी वेरुळ येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List