पुण्यात कोयता गँग अस्तित्वात नाही, ‘भाई’ होण्याच्या आकर्षणापोटी कोयत्याचा वापर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

पुण्यात कोयता गँग अस्तित्वात नाही, ‘भाई’ होण्याच्या  आकर्षणापोटी कोयत्याचा वापर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

पुणे शहर परिसरात कोणतीही कोयता गँग अथवा कोयत्याचा वापर संघटित गुन्हेगारी करणारी टोळी अस्तित्वात नाही. भाई (गुंड) होण्याच्या आकर्षणापोटी काही अल्पवयीन मुले कोयत्याचा वापर करीत दहशत माजवत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

पुण्यातील धानोरी लोहगाव परिसरात कोयता गँगने दुकाने व रस्त्यावरील वाहनांच्या काचा पह्डल्याच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील चर्चेत भाग घेताना आमदार सुनील टिंगरे यांनी मुलांना अमली पदार्थांचे व्यसन लावले जात असल्याचे सांगत कारवाईची मागणी केली.

या चर्चेला मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी संघटित गुन्हेगारी करणारी कोणतीही कोयता गँग नसल्याचे सांगितले. पण गुंडगिरीच्या आकर्षणापोटी काही अल्पवयीन मुले कोयता हाती घेऊन अशा प्रकारचे गुन्हे करतात.  मात्र या मुलांचा वापर करून गुन्हे करणाऱ्यांना प्रत्यक्ष गुन्हा केला आहे असे समजून त्यांच्यावर कारवाई केली जाईल तसेच पोलिसांचा यात सहभाग आढळल्यास त्यांना थेट बडतर्फ करण्यात येईल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. शहरातील अनेक टपऱ्या किंवा अन्य ठिकाणावरून अशा प्रकारच्या गोष्टींची विक्री केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र त्यासाठी अशा पण टपऱ्या आणि अन्य ठिकाणावर लक्ष ठेवण्यात येत असून यात कोणी सापडल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सीसीटीव्ही जाळे मजबूत

त्याचबरोबर पुण्यातील सीसीटीव्हीचे जाळे आणखी मजबूत करण्यात येणार आहे, जेणेकरून अशा प्रकारच्या गुह्यांवर लक्ष ठेवता येईल. वाहनांची तोडपह्ड करण्याच्या घटनांमध्ये किंवा अन्य घटनांमध्ये लहान मुलांचा अन्य लोकांकडून वापर केला जातो. त्यांना अमली पदार्थांचे व्यसन लावून त्यांच्याकडून काही गुन्हे करवून घेतले जातात. अशा प्रकारे लहान मुलांना कामावर ठेवून गुन्हे करणाऱ्या सज्ञान व्यक्तीला, संबंधित गुन्हा त्यानेच केला आहे असे समजून त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘आई तुळजाभवानी’ मालिकेत खास राज्याभिषेक सोहळा; अशी झाली तयारी ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत खास राज्याभिषेक सोहळा; अशी झाली तयारी
अलौकीक सौंदर्याचे प्रतीक, अगाध शक्तीचे स्वरूप, अपरिमित वात्सल्याची मूर्ती, धर्मरक्षिण्या आसनस्थ होणार सिंहासनी 'आई तुळजाभवानी'. कलर्स मराठी वाहिनीवर आई राजा...
आधी झोपेच्या गोळ्या दिल्या नंतर शरीराचे 15 तुकडे केले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या
धक्कादायक! मूल होत नाही म्हणून पत्नीने घातला पतीच्या डोक्यात दगड
Weight Loss- वजन कमी करण्यासाठी आपल्या किचनमधील ‘हे’ गरम मसाले आहेत उपयुक्त! वाचा सविस्तर
उन्हाचा कडाका वाढला, पुरेशी काळजी घ्या! महापालिकेच्या आरोग्य विभागाचे आवाहन
लाडक्या बहिणींचे पैसे वळविले कर्ज खात्यात, अजित नागरी पतसंस्थेच्या विरोधात ठिय्या आंदोलन; न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार
गेट वे हून जेएनपीएला चला 35 मिनिटांत; स्पीड बोटीची शुक्रवारी ट्रायल