प्रशांत कोरटकरच्या अटकेचा मार्ग अखेर मोकळा, कोल्हापूर न्यायालयाने अंतरिम जामीन फेटाळला

प्रशांत कोरटकरच्या अटकेचा मार्ग अखेर मोकळा, कोल्हापूर न्यायालयाने अंतरिम जामीन फेटाळला

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी देत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्ये करणारा नागपूरचा तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याचा अंतरिम जामीन अर्ज आज कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे कोरटकरच्या अटकेचा मार्ग अखेर 20 दिवसांनी मोकळा झाला आहे. पोलिसांकडून कोरटकरच्या मुसक्या कधी आवळल्या जातात, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

प्रशांत कोरटकरवर कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र पोलीस संरक्षण असतानाही कोरटकर फरार आहे. अनेक दिवसांपासून पोलिसांच्या तो रडारवर आहे; पण सापडत नाही. या काळात कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाकडून कोरटकरला दोन वेळा अटकपूर्व अंतरिम जामीन मिळाला होता. कोरटकरने आपल्या वकिलांमार्फत अंतरिम जामीन वाढवून द्यावा, अशी विनंती केली होती. सोमवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आज जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांनी कोरटकरचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला आहे.

बिळातून बाहेर काढून अटक करा – इंद्रजित सावंत

‘‘छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणारा कोरटकर कोणत्या बिळात लपून बसला असेल तिथून बाहेर काढून त्याला पोलिसांनी तत्काळ अटक करावी,’’ अशी मागणी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केली. ‘‘कोरटकरवर कायद्याने कारवाई होऊन कठोर शिक्षा झाली तर महापुरुषांबद्दल अवमानकारक बोलण्याचे धाडस यापुढे कोणी करणार नाही,’’ असे सावंत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

निर्मात्याने अभिनेत्रीच्या प्रायव्हेट पार्टला मारलं, जबडा तोडला…, ऐकताच ऐश्वर्या रायने घेतला मोठा निर्णय निर्मात्याने अभिनेत्रीच्या प्रायव्हेट पार्टला मारलं, जबडा तोडला…, ऐकताच ऐश्वर्या रायने घेतला मोठा निर्णय
एक दिवस त्याने मला प्रचंड मारलं… त्याने माझा जबजा तोडला… तो थांबला नाही… माझ्या प्रायव्हेट पार्टला त्याने मारलं आणि माझ्याकडून...
खास लोकाग्रहास्तव स्टार प्रवाहच्या मालिकेत परत येतेय प्रेक्षकांची आवडती नायिका
गौरीसोबत आमिर खानच्या रिलेशनशिपबद्दल विक्रम भट्ट स्पष्टच म्हणाला..
एक्स गर्लफ्रेंडसोबत ‘टाइमपास करत होतो’ म्हटल्यानंतर आदर जैनची सारवासारव
प्रसिद्ध कॉमेडियनला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, अल्पवयीन मुलीवर बलात्कार
कचऱ्याचे ढीग, भीषण पाणीटंचाई, ट्रॅफिक जाम; घोडबंदरवासीयांची तिहेरी कोंडी! मूलभूत सोयीसुविधा देण्यास ठाणे महापालिका सपशेल फेल
पोलीस डायरी – पोलिसांनो, गुलाम नको, ‘सिंघम’ व्हा!