Potato For Face- उजळ त्वचेचं सिक्रेट दडलंय कच्च्या बटाट्यामध्ये! वाचा बटाट्याचे सौंदर्यासाठी उपयोग

Potato For Face- उजळ त्वचेचं सिक्रेट दडलंय कच्च्या बटाट्यामध्ये! वाचा बटाट्याचे सौंदर्यासाठी उपयोग

चेहऱ्यावरील एक पिंपल मुलींची झोप उडवते. पण असं असलं तरी, एक मात्र खरं की मुली यावरही पटदिशी उपायही शोधून काढतात. चेहऱ्यावर कधी गालावर, हनुवटीजवळ मुरुमांचे डागही अनेकदा राहतात. अशावेळी रासायनिक सौंदर्यप्रसाधनांपेक्षा नैसर्गिक उपाय करणे हे केव्हाही श्रेष्ट मानले जाते. स्वयंपाकघरातील बटाटा सौंदर्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. त्यामुळे त्वचेवरील जुनाट डाग कमी करण्यासाठी बटाटा हा प्रभावी ठरतो.

 

चेहऱ्यावर बटाटा लावण्याचे फायदे

बटाटा केवळ आपल्या आरोग्यासाठीच फायदेशीर नाही तर त्वचेशी संबंधित अनेक समस्यांसाठी देखील त्याचा वापर फायदेशीर मानला जातो. आपण बटाट्याचा रस चेहऱ्यावर लावतो, त्यावेळी बटाट्यांमधील ब्लीचिंग गुणधर्म डाग कमी करण्यास मदत करतात. त्यात स्टार्च असते जे त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि त्वचा मऊ मुलायम बनते. बटाट्यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करतात. तसेच बटाट्यातील व्हिटॅमिन सी त्वचेचा रंग उजाळण्यास मदत करतो.

 

बटाट्याचा सीरम कसा तयार करायचा?

व्हिटॅमिन ई कॅप्सूल – २
मध – १ टेबलस्पून
लिंबाचा रस – १ चमचा
बटाट्याचा रस – ३ टेबलस्पून
कापसाचा बोळा

 

सर्वप्रथम एक वाटी घेऊन त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल तेल, मध, लिंबाचा रस आणि बटाट्याचा रस घालून चांगले मिसळून घ्यावे. नंतर एक कापसाचा पॅड किंवा थोडासा कापसाचा गोळा घ्या आणि तो तयार केलेल्या सीरममध्ये बुडवा आणि चेहऱ्यावर लावावा. चेहऱ्यावर लावल्यानंतर, १० मिनिटे सुकू द्यावे. नंतर साध्या पाण्याने चेहरा नीट धुवावा.

 

फक्त एका वापरानंतर तुमचा चेहरा कसा चमकतो ते पाहा. तुम्ही हा उपाय आठवड्यातून २-३ वेळा वापरू शकता आणि चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जळगावच्या चोपडा एसटी बसस्थानकात गुजरात पॅटर्न, बसपोर्टच्या धर्तीवर विकास जळगावच्या चोपडा एसटी बसस्थानकात गुजरात पॅटर्न, बसपोर्टच्या धर्तीवर विकास
राज्यातील एसटी स्थानकांचा बीओटी ( बांधा वापरा आणि हस्तांतरित करा) तत्वावर विकास करण्यात येणार आहे. यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार...
Boat Drowned – भाविकांची धरणात बोट बुडाली; 7 भाविक बेपत्ता, 8 जणांना सुखरुप वाचवले
हजारो लोकं अश्रू ढाळताहेत…! बिल्डरांकडून होणाऱ्या फसवणुकीवर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
तेव्हा एकनाथ शिंदे मोदींच्या डस्टबिनमध्ये होते; उद्धव ठाकरे यांचा सणसणीत टोला
मुख्यमंत्री म्हणाले नागपूर दंगल पूर्वनियोजित; सोशल मीडियावर ‘चल दंगल समजून घेऊ’ कविता पुन्हा चर्चेत
Buldhana News – पाडकाम करताना घर अंगावर कोसळलं, बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू
गुहागरच्या खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात बोगस प्रवेश अन् करोडोंचा गैरव्यवहार, भास्कर जाधव यांचा खळबळजनक आरोप