Facial – लग्नाच्या सीझनसाठी तुम्ही काय करणार फेशियल की क्लीनअप? त्वचेसाठी सर्वात उत्तम काय, वाचा सविस्तर
आपल्या प्रत्येकाला ग्लोईंग त्वचा हवी असते. पण त्यासाठी मात्र नेमकं काय करायचं हे आपल्याला अनेकदा कळत नाही. आपण आहार आणि त्वचेची काळजी या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देणे हे आवश्यक आहे. आहारातील उत्तम बदल हा निरोगी त्वचेसाठी खूप गरजेचा आहे. सध्याच्या घडीला केवळ स्त्रियाच नाही तर, चमकदार त्वचा मिळविण्यासाठी पुरुषही आता फेशियल करु लागले आहेत.फेशियल करावं की क्लिनअप यातील कोणता पर्याय त्वचेसाठी जास्त फायदेशीर आहे. हेच आपण आज जाणून घेणार आहोत.
फेशियल आणि क्लीनअपमध्ये काय फरक आहे?
फेशियल आणि क्लिनअप दोन्ही त्वचेसाठी फायदेशीर आहेत. परंतु त्वचेचा प्रकार, त्वचेची समस्या आणि त्वचेची संवेदनशीलता यानुसार त्यांची निवड करणे गरजेचे आहे. त्वचेची कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर त्वचा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच स्वतःसाठी योग्य पर्याय निवडावा.
त्वचेसाठी क्लिनअप का फायदेशीर आहे?
क्लिनअप करण्यासाठी त्वचा खोलवर स्वच्छ केली जाते. यामध्ये त्वचेची स्वच्छता, एक्सफोलिएशन आणि स्टीमिंग केले जाते. तसेच यावेळी ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स काढून टाकले जातात. क्लिनअप केल्यामुळे मुरुमे आणि पुरळ यासारख्या समस्यांचा धोका कमी होतो. हे उपचार प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे आणि महिन्यातून १ ते २ वेळा करणं हितावह आहे.
त्वचेसाठी फेशियल का फायदेशीर आहे?
फेशियल हा सर्वात उत्तम पर्याय मानला जातो. यामध्ये सौंदर्यप्रसाधनांचा सर्वाधिक वापर करण्यात येतो. त्यामुळेच फेशियलचा परिणाम हा दीर्घकाळ चेहऱ्यावर टिकतो. फेशियल करताना त्यामध्ये क्लींजिंग, एक्सफोलिएशन, मसाज आणि फेस मास्क या पद्धतींचा अवलंब केला जातो. मुरुमे, स्किन टॅनिंग तसेच एन्टी एजिंग याकरता वेगवेगळ्या प्रकारची फेशियल केली जातात. फेशियलमुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करते आणि हायड्रेशन आणि चमक राखली जाते.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List