निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, मतदान कार्ड ‘आधार’शी लिंक करण्याचा निर्णय

निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, मतदान कार्ड ‘आधार’शी लिंक करण्याचा निर्णय

मतदान कार्ड ‘आधार’शी लिंक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक आयोगाची एक महत्त्वाची बैठक आज दिल्लीत पार पडली. या बैठकीत मतदान कार्ड ‘आधार’शी लिंक करण्याचा निर्णय घेण्यात आला. संविधानाच्या अनुच्छेद 326 आणि लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदींच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि निवडणूक आयुक्त विवेक जोशी, केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन, विधिमंडळ विभागाचे सचिव राजीव मणी आणि यूआयडीएआयचे सीईओ भुवनेश कुमार यांच्यात दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत मतदान कार्ड ‘आधार’शी लिंक करण्यास मंजुरी देण्यात आली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे. संविधानाच्या अनुच्छेद 326 आणि 1950 च्या लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 23(4), 23(5) आणि 23(6) नुसार EPIC आधारशी लिंक केले जाईल, असे निवेदनात म्हटले आहे. यापूर्वी सरकारने पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याचा निर्णय घेतला होता. अनुच्छेद 326 नुसार फक्त हिंदुस्थानच्या नागरीकाला मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.

पुढील तीन महिन्यांत डुप्लिकेट क्रमांक असलेल्या मतदार ओळखपत्रांना नवीन EPIC क्रमांक जारी केले जातील. डुप्लिकेट क्रमांक असण्याचा अर्थ बनावट मतदार नाही, असे निवडणूक आयोगाने अलिकडेच म्हटले होते. EPIC शी आधार लिंक करण्यामागील मुख्य उद्देश मतदार यादीतील अनियमितता दूर करणे आणि ती पारदर्शक करणे हा आहे. या पावलामुळे बनावट मतदार ओळखण्यास मदत होईल, असा निवडणूक आयोगाला विश्वास आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

क्षयरोग रुग्णालयास सोयीसुविधा देणार क्षयरोग रुग्णालयास सोयीसुविधा देणार
शिवडी येथील क्षयरोग रुग्णालय हे राज्यातील सर्वात मोठे क्षयरोग रुग्णालय आहे. या रुग्णालयास आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा पुरवण्यात येतील अशी...
राज्याचे सांस्कृतिक केंद्र  बीकेसीत उभारणार
अंधेरी गॅस गळतीप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा
शास्त्रीय संगीताचे रंग उलगडणारा ‘फागुनोत्सव’
जळगावच्या चोपडा एसटी बसस्थानकात गुजरात पॅटर्न, बसपोर्टच्या धर्तीवर विकास
Boat Drowned – भाविकांची धरणात बोट बुडाली; 7 भाविक बेपत्ता, 8 जणांना सुखरुप वाचवले
हजारो लोकं अश्रू ढाळताहेत…! बिल्डरांकडून होणाऱ्या फसवणुकीवर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी