औरंगजेब कबरीमुळे राज्यात तणावपूर्ण वातावरण, मराठी गायक म्हणाला, आपल्याला शत्रुची गरज नाही कारण…
अनेक हिंदू संघटनांनी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली आहे. दरम्यान नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री मोठा हिंसाचार झाला. दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. सध्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला आहे. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर फक्त राजकारणी व्यक्तीच नाही तर, सेलिब्रिटी देखील व्यक्त होत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःचं मत मांडलं आहे. आता लोकप्रिय गायक मंगेश बोरगांवकर (Mangesh Borgaonkar) याने औरंगजेब प्रकरणावर मोठं वक्तव्य केलं आहे.
मंगेश बोरगांवकर याने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये गायकाने देशातील सत्य परिस्थीती दाखण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या गायकाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मंगेशनं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक कार्टून चित्र असलेली पोस्ट शेअर केली आहे.
गायकाच्या पोस्टमध्ये सर्वात अधिक महत्त्वाचा विषय औरंगजेबाचा असल्याचा दाखण्याचा प्रयत्न केला आहे. तर महागाई, बेरोजगारी, गुंडगिरी, हत्या, कायदा, शेतकरी आत्महत्या, आर्थिक परिस्थिती, पाणी समस्या आणि असे राज्यातील अनेक प्रश्न मागेच राहिल्याचं दाखवलं आहे.
पोस्ट शेअर करत मंगेश बोरगांवकर याने कॅप्शनमध्ये, ‘वर्तमान…. भविष्याचे मूलभूत प्रश्न समोर असताना भूतकाळात रमणारे आपण. आपल्याला शत्रूची गरज नाही; आपणच पुरे आहोत!’ असं लिहिलं आहे. गायकाची पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
‘छावा’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमात अभिनेता विकी कौशल याने छत्रपती संभाजी महारांजांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेता अक्षय खन्ना याने औरंगजेबाच्या भूमिकेला न्याय दिला आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील बक्कळ कमाई केली. सिनेमाने फक्त भारतातच नाही तर, जगभरात मोठे विक्रम रचले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List