‘प्रेमाची गोष्ट’मध्ये मुक्ताचा नवा लूक; प्रेक्षकही झाले थक्क!
'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेतील मुक्ता एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा नवा अवतार मुक्ता धारण करणार आहे लाडक्या सईसाठी.
सईवर मुक्ताचं जीवापाड प्रेम आहे. सईशिवाय ती एक क्षणही राहू शकत नाही. मात्र चिमुकली सई मुक्ताईवर रुसली आहे. मुक्ताईचं पूर्वीसारखं आपल्यावर प्रेमच नाही असा गैरसमज तिने करुन घेतला आहे. म्हणूनच तर रागावलेली सई सध्या मुक्तापासून दूर सावनीच्या घरी रहात आहे.
सईचा रुसवा घालवण्यासाठी मुक्ताने एक नवी युक्ती शोधून काढली आहे. वृद्ध गोदा मावशीचा वेश धारण करुन ती सावनीच्या घरी सईला भेटण्यासाठी जाणार आहे.
आपल्या मुलांच्या प्रेमाखातर एक आई काय काय करु शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुक्ताई. मुक्ताचं हे नवं रुप सावनीला सळो की पळो करुन सोडणार हे मात्र नक्की.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List