शक्ती कपूरवर आली मुंबईतील घर विकण्याची वेळ, काय आहे नेमकं कारण?
बॉलिवूडमधील सर्वात अनुभवी अभिनेत्यांपैकी एक म्हणून शक्ती कपूर ओळखले जातात. गेल्या काही दिवसांपासून ते चित्रपटांमध्ये जरी दिसत नसले तरी एक काळ असा होता जेव्हा त्यांच्याकडे चित्रपटांच्या तुफान ऑफर्स असायच्या. त्यांनी कधी विनोदी भूमिका साकारली तर कधी नकारात्मक भूमिका करून वातावरणनिर्मिती केली. आता भलेही ते चित्रपटांमध्ये सक्रिय नसले तरी खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. नुकताच शक्ती कपूर यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.त्यांनी मुंबईतील जुहू येथील आलिशान अपार्टमेंट विकले आहे. शक्ती कपूर यांनी हे आपर्टमेंट का विकले? कितीला विकले गेले? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
कुठे आहे शक्ती कपूर यांचे हे घर?
मुंबईतील जुहू परिसर हा पॉश भागांपैकी एक आहे. मुख्य स्थान, समुद्रकिनारा आणि सिने हब यामुळे जुहू हे नेहमीच आकर्षण ठरते आणि मुंबईतील महागड्या ठिकाणांपैकी एक आहे. शक्ती कपूर यांचे जुहू येथील सिल्व्हर बीच हेवन को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये घर होते. त्यांनी आता हे घर विकले आहे. त्यांनी ६.११ कोटी रुपयांना हे घर विकले आहे. शक्ती कपूर यांचे हे घर ८१.८४ क्वेअर मीटरमध्ये होते. त्यांनी डिसेंबर २०२४मध्ये हे घर विक्रीसाठी काढले होते. घराच्या रजिस्ट्रेशनसाठी शक्ती कपूर यांनी ३० हजार रुपये दिले होते. तसेच ३६.६६ लाख रुपये स्टॅम्प ड्यूटी दिली होती.
काय आहे कारण हे घर विकण्यामागे?
समोर आलेल्या माहितीनुसार, श्रद्धा आणि शक्ती कपूर यांनी काही दिवसांपूर्वीच जुहूमध्ये एक नवीन अपार्टमेंट खरेदी केले होते. हे अपार्टमेंट जुहू येथील पिरामल महालक्ष्मी साऊथ टॉवरमध्ये आहे. या टॉवरमधील घरांतून अतिशय सुंदर समुद्र किनारा दिसतो. या टॉवरमध्ये घर घेण्यासाठी अनेक बडे कलाकार प्रयत्न करत आहेत. हे नवीन अपार्टमेंट खरेदी करण्यासाठी शक्ती कपूर यांनी जुने घर विकले आहे.
अक्षय कुमार, अजय देवगण, साजिद खान आणि वरुण धवन यांसारख्या स्टार्सची जुहूमध्ये आहेत. शक्ती कपूरबद्दल सांगायचे तर, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक कॉमिक भूमिका साकारल्या. आपल्या कारकिर्दीत 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या देशातील मोजक्या अभिनेत्यांपैकी ते एक आहेत. यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. आता अभिनेत्याची मुलगी श्रद्धा कपूर चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि बॉलिवूडचा एक भाग आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List