“गर्भपात नाही केला तर..”; वन नाईट स्टँडनंतर प्रेग्नंट राहिलेल्या अभिनेत्रीचा खुलासा

“गर्भपात नाही केला तर..”; वन नाईट स्टँडनंतर प्रेग्नंट राहिलेल्या अभिनेत्रीचा खुलासा

‘सेक्रेड गेम्स’ फेम अभिनेत्री कुब्रा सेत तिच्या बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. कुब्राने तिच्या आयुष्यावर एक पुस्तकसुद्धा लिहिलं आहे. ‘ओपन बुक’ असं त्याचं नाव असून यामध्ये कुब्राने तिच्या खासगी आयुष्याविषयी मोठा खुलासा केला होता. 2013 मध्ये एका वन नाईट स्टँडनंतर गरोदर राहिल्याचा खुलासा कुब्राने या पुस्तकात केला होता. ही गोष्ट कोणाला कळू नये म्हणून तिने सगळ्यांपासून लपून गर्भपातदेखील केला होता. आता जवळपास 12 वर्षांनंतर कुब्रा या घटनेबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली आहे. कुब्राने गर्भपात करण्याचा निर्णय का घेतला होता, त्यावेळी तिची मानसिक स्थिती काय होती, याविषयी तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.

‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत कुब्रा म्हणाली, “जेव्हा मी गर्भपाताचा निर्णय घेतला, तेव्हा त्या कठीण काळातून जात असताना मी मानसिकदृष्ट्या फार स्थिर नव्हती. त्यावेळी मी खूप हळवी आणि कमकुवत झाली होती. गर्भपात नाही केला तर त्या बाळासोबत राहण्याची माझ्यात हिंमत नव्हती. माझ्या मनावर त्याचा खूप परिणाम झाला होता. मी फार नकारात्मक झाली होती. मी या लायक नाही, असं मला त्यावेळी वाटत होतं. नंतर मला याची जाणीव झाली की मी जो निर्णय घेतला, तो माझ्यासाठी घेतला आहे. त्या निर्णयावर ठाम राहणं खूप गरजेचं होतं.”

याविषयी तिने पुढे सांगितलं, “माझ्या गरोदरपणाबद्दल कोणालाच माहीत नव्हतं. मी स्वत: रुग्णालयात गेले आणि गर्भपात केला. त्याविषयीसुद्धा कोणाला कानोकान खबर लागू दिली नव्हती. मी दोन ते तीन आठवड्यांपर्यंत खूप विचार करू लागले होते. नंतर मी एका मैत्रिणीला कॉफी शॉपमध्ये भेटले. तिला मी सांगितलं की मला गर्भपात करायचा आहे. तेव्हा तिला धक्काच बसला. मी अचानक रडू लागले होते, कारण माझ्या लक्षात आलं की मी कोणालाच याविषयी सांगितलं नव्हतं. मी कोणत्या परिस्थितीतून जात होते, हे कोणालाच माहीच नव्हतं.”

कुब्राने असाही खुलासा केला की गर्भपाताच्या काही वर्षांनंतर तिला त्रास जाणवू लागला होता. “गर्भपाताच्या पाच ते सहा वर्षांनंतर मला खूप ब्लीडिंग होत होती. त्यावेळी मी एका ट्रॅव्हल शोसाठी शूटिंग करत होती. मला खूप गरम होत होतं आणि मी आजारी पडले होते. माझी खूप चिडचिड होत होती. मला कोणीच समजून घेणार नाही, या विचाराने मी कोणालाच काही सांगितलं नाही. पण जेव्हा मी माझ्या आयुष्यावर पुस्तक लिहित होते, तेव्हा मला कोणाचीच पर्वा नव्हती. जर मी माझ्याच निर्णयांबद्दल स्वत:शी प्रेमाने वागू शकत नाही, तर काय उपयोग”, असं तिने सांगितलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राजीनामा देताच संभाजी भिंडेंचा धनंजय मुंडेंना सल्ला म्हणाले…. राजीनामा देताच संभाजी भिंडेंचा धनंजय मुंडेंना सल्ला म्हणाले….
बीड जिल्ह्याच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सरकारकडून सीआयडीकडे सोपवण्यात आला...
Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर? सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
‘अ परफेक्ट मर्डर’चा महिला दिन विशेष प्रयोग; एक सरळ सोपी केस की न उलगडलेलं कोडं?
समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा जबरदस्त टीझर
विवाहित दिग्दर्शकासोबत ‘प्रेमसंबंध’, गरोदर राहिल्यानंतर अभिनेत्रीने अबॉर्शनसाठी मागितली इतकी रक्कम!
‘मन सुन्न करणारे फोटो’, संतोष देशमुख हत्या प्रकरणावर ‘हास्यजत्रा’मधील अभिनेत्याचा संताप
‘छावा’ मधील बालकलाकार हुबेहूब दिसतो सलमान खान सारखा, तेच डोळे, तसेच केस…, व्हिडीओ पाहून म्हणाल…