पालघर जिल्ह्यातील 58 हजार महिला झाल्या ‘लखपती’, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, हस्तकला, कुटीर उद्योग यशस्वी

पालघर जिल्ह्यातील 58 हजार महिला झाल्या ‘लखपती’, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, हस्तकला, कुटीर उद्योग यशस्वी

पालघर जिल्ह्यातील 58 हजार 662 महिलांचे लखपती होण्याचे स्वप्न अखेर साकारले आहे. दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, हस्तकला, कुटीर उद्योग यशस्वी करून महिलांनी उत्पन्नाचा स्वतः मार्ग शोधला आहे. घरची कामे करून आदिवासीबहुल जिल्ह्यातील महिलांनी मोठ्या कष्टाने हे यश मिळवले असून आणखी 14 हजार 593 महिलांनी लखपती बनवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. स्वावलंबनाने स्वतःच्या पायावर उभ्या राहणाऱ्या महिलांचे मासिक उत्पन्न सरासरी 9 ते 10 हजार रुपये एवढे झाले आहे.

राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी असलेल्या लखपती दीदी योजनेत पालघर जिल्ह्यातल्या 73 हजार 255 महिलांना या अभियानात समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी मोखाडा, जव्हार, डहाणू, वसई, विक्रमगड, वाडा, तलासरी आणि पालघर या आठ तालुक्यांमध्ये एकूण 58 हजार 662 महिला लखपती झाल्या आहेत.

लखपती दीदी अभियानामुळे पालघर जिल्ह्यातील हजारो महिलांचे जीवन बदलले आहे. स्वयं-सहाय्यता गट आणि आर्थिक मदतीच्या विविध योजनांच्या माध्यमातून या महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे. यामुळे केवळ त्यांचे उत्पन्नच वाढले नाही तर त्यांच्या कुटुंबांचेही जीवनमान उंचावले आहे. पालघर जिल्ह्यात महिलांना सक्षम बनवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. 

भानुदास पालवे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर

तालुकानिहाय संख्या 

पालघर- १२,२११, डहाणू ११,५४७, तलासरी – ६,८६२, वाडा – ६,५८६, विक्रमगड – ६,५१७, जव्हार – ६,०३७, मोखाडा – ५,६६३, वसई – ३,२३९,

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

…तेथे बांधकाम सुरु होते त्यामुळे त्यांच्या हल्ल्याची धार वाढली, नागपूर पोलिसांनी सांगितला सगळा घटनाक्रम …तेथे बांधकाम सुरु होते त्यामुळे त्यांच्या हल्ल्याची धार वाढली, नागपूर पोलिसांनी सांगितला सगळा घटनाक्रम
नागपूर हे निसर्गाचे वरदान असणारे टुमदार शहर काल सुर्यास्तानंतर दगडफेक आणि जेसीबी वाहनांच्या धुराने अचानक वेढले. दोन्ही बाजूंनी जमावाने घोषणाबाजी...
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर लोटांगण घातले? कोणी केला आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
कुणी तरी येऊन सांगितलं… चला हिंदूंना मारायला… मुस्लमानांना…; किरण मानेची नागपूर दंगलीवरून टीका
Ratnagiri News – पर्यटकांसाठी करमणुकीची नवी मेजवानी! थिबा पॅलेस येथे मल्टिमीडिया शो सुरू
रसगुल्ला खाताच जमिनीवर कोसळला आणि मरण पावला, काय घडलं नेमकं?
छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला; अटक होण्याची शक्यता
रत्नागिरी जिल्ह्यात यंदा 357 गावातील 722 वाड्यांमध्ये पाणीटंचाईची शक्यता; संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार