‘जणू सिद्धू मूसेवालाच परत आलाय’; ज्युनियर सिद्धूला पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

‘जणू सिद्धू मूसेवालाच परत आलाय’; ज्युनियर सिद्धूला पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

दिवंगत पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धू मूसेवालाचा छोटा भाऊ शुभदिपचा सोमवारी पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग छन्नीसुद्धा उपस्थित होते. सोशल मीडियावर त्यांनी या सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘हॅपी बर्थडे सिद्धू साहब (वाढदिवसाच्या शुभेच्छा सिद्धू साहेब)’ असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओ दिलं आहे. काळ्या रंगाचा कुर्ता-पायजमा आणि डोक्यावर गुलाबी पगडी अशा पोशाखात छोटा सिद्धू खूपच क्यूट दिसत होता. यावेळी सिद्धू मूसेवालाचा मोठा कटआऊट फोटो मागे लावलेला दिसून आला.

गेल्या वर्षी दिवंगत सिद्धू मूसेवालाची आई चरण कौर यांनी वयाच्या 58 व्या वर्षी मुलाला जन्म दिला होता. सिद्धू मूसेवालाचं मूळ नाव शुभदिप असं होतं. त्यामुळे त्याच्या आईवडिलांनी दुसऱ्या मुलाचं नावसुद्धा शुभदिप असंच ठेवलंय. वयाच्या 28 वर्षी सिद्धू मूसेवाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 29 मे 2022 रोजी पंजाबमधील मनसा याठिकाणी सिद्धूवर 20 ते 30 गोळ्या झाडल्या होत्या. राज्य सरकारने सिद्धू मूसेवालाची सुरक्षाव्यवस्था काढून घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळीबार केला होता. काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरून त्याने मनसा मतदारसंघात पंजाब विधानसभा निवडणूक लढवली होती. सिद्धूच्या हत्येप्रकरणी 31 जणांवर आरोप करण्यात आले होते. ज्यामध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांचाही समावेश होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सिद्धू मूसेवाला हा पंजाबमधील अत्यंत प्रसिद्ध गायक आणि रॅपर होता. तो स्वत:च त्याची गाणी लिहायचा आणि त्यांची निर्मिती करायचा. तो सर्वांत श्रीमंत पंजाबी गायकांपैकी एक होता. सिद्धूने 2017 मध्ये संगीतविश्वात पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर त्याचे अनेक म्युझिक अल्बम गाजले. ‘लेजंड’, ‘सो हाय’, ‘द लास्ट राइड’ यांसारख्या त्याच्या गाण्यांना चाहत्यांकडून खूप प्रतिसाद मिळाला. सिद्धूच्या निधनानंतरही त्याची गाणी कुटुंबीयांकडून प्रदर्शित करण्यात आली आणि त्यांना सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाला. सिद्धू मूसेवाला हा एकुलता एक मुलगा होता. एकुलत्या एक तरुण मुलाच्या हत्येच्या घटनेनं बलकौर सिंग आणि चरण कौर पूर्णपणे खचले होते. अखेर वयाच्या 58 व्या वर्षी चरण कौर यांनी IVF द्वारे पुन्हा आई होण्याचा प्रयत्न केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चाळीशीत अप्सरा दिसाल, नवरा पुन्हा प्रेमात पडेल, फक्त आठवड्यातून 3 दिवस नारळ पाणी प्या चाळीशीत अप्सरा दिसाल, नवरा पुन्हा प्रेमात पडेल, फक्त आठवड्यातून 3 दिवस नारळ पाणी प्या
उन्हात नारळ पाणी पिण्याची मजा काही औरच असते, पण तुम्हाला माहित आहे का की, हे फक्त तहान भागवण्यासाठी आणि ताजेपणा...
MERC चा ग्राहकांना शॉक, वीज दर कपातीला तात्पुरती स्थगिती
IPL 2025 – जॉस बटलरची झुंजार अर्धशतकीय खेळी, गुजरातने RCB चा केला 8 विकेटने पराभव
मी जरी डॉक्टर नसलो तरी कोणाच्या मानेचा पट्टा…., एकनाथ शिंदेंचा पुन्हा नाव न घेता ठाकरेंवर हल्लाबोल
छत्रपती शिवाजी महाराज 100 टक्के सेक्युलर राजे होते, त्यांच्या सैन्यात मुस्लीमही होते, नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
Mumbai Local – कुर्ला स्टेशनवर पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून धूर, प्रवाशांची धावाधाव
लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडली, उपचारासाठी दिल्लीला रवाना