“प्लीज मला एक्स वाइफ बोलू नका..”; ए. आर. रेहमान यांच्या पत्नीची विनंती

“प्लीज मला एक्स वाइफ बोलू नका..”; ए. आर. रेहमान यांच्या पत्नीची विनंती

जगप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांना रविवारी सकाळी चेन्नईमधल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या काही चाचण्या केल्या आणि उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज दिला. त्यांच्या प्रकृतीबद्दल आता पत्नी सायरा बानू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचप्रमाणे “कृपया मला रेहमान यांची पूर्व पत्नी असं म्हणू नका”, अशी विनंती त्यांनी माध्यमांना केली आहे.

ए. आर. रेहमान यांच्या प्रकृतीविषयीची माहिती देण्यासाठी सायरा यांनी ‘एबीपी न्यूज’ला एक व्हॉइस नोट पाठवली. यामध्ये त्या म्हणाल्या, “अस्सलाम वालेकुम, मी सायरा रेहमान बोलतेय. ए. आर. रेहमान हे लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करते. त्यांना छातीत दुखत होतं आणि त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली, अशी माहिती मला मिळाली आहे. अल्लाहच्या कृपेने ते आता ठीक आहेत.”

या व्हॉइस नोटमध्ये सायरा पुढे म्हणाल्या, “मी तुम्हा सर्वांना हे सांगू इच्छिते की आम्ही अधिकृतरित्या विभक्त झालो नाही. आम्ही आताही पती-पत्नीच आहोत. माझ्या आरोग्याच्या कारणामुळे आम्हाला थोडं वेगळं व्हावं लागलं. गेल्या दोन वर्षांपासून माझी प्रकृती ठीक नाही आणि मला त्यांना आणखी ताण द्यायचा नव्हता. मी माध्यमांना विनंती करते की कृपया मला पूर्व पत्नी किंवा एक्स वाइफ असं म्हणू नका. गोष्ट एवढीच आहे की आम्ही फक्त वेगळे राहतो. परंतु माझ्या दुआं कायम त्यांच्यासोबत आहेत. मी त्यांच्या कुटुंबीयांनाही हे सांगू इच्छिते की त्यांनी रेहमान यांना फार ताण देऊ नये आणि त्यांची काळजी घ्यावी.’

दुसरीकडे चेन्नईच्या अपोलो रुग्णालयाने ए. आर. रेहमान यांच्या प्रकृतीविषयी मेडिकल बुलेटिन जारी केलंय. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय, ‘ए. आर. रेहमान यांना डिहायड्रेशनची समस्या असल्याने ते रविवारी सकाळी रुग्णालयात दाखल झाले होते. नियमित तपासणीनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.’

ए. आर. रेहमान यांचा मुलगा अमीन यानेसुद्धा वडिलांच्या प्रकृतीविषयीची माहिती दिली आहे. “मी सर्व चाहत्यांचे, कुटुंबीयांचे आणि शुभचिंतकांचे आभार मानतो. माझ्या वडिलांना डिहायड्रेशनमुळे कमकुवतपणा जाणवत होता. त्यामुळे आम्ही त्यांच्या नियमित चाचण्यांसाठी गेलो होतो. त्यांची प्रकृती आता ठीक आहे”, असं त्याने म्हटलंय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

डोकेदुखीची समस्या होईल दूर, आहारामध्ये ‘या’ पदार्थांचे करा सेवन… डोकेदुखीची समस्या होईल दूर, आहारामध्ये ‘या’ पदार्थांचे करा सेवन…
आयुर्वेदामध्ये असे अनेक वनसपतींबद्दल सांगितले आहेत ज्याचे सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. बदलत्या ऋतूमध्ये तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष...
शरद पवार गटात पुन्हा राजकीय भूकंप?, जयंत पाटील असं काय बोलले हसन मुश्रीफांकडे? मुश्रीफांचा दावा काय?
550 कोटींची मालक फोटोतील ही लहान मुलगी, एका चित्रपटासाठी घेते 15 कोटी, परिवारात अनेक सुपरस्टार्स
बदलत्या हवामानात फ्लूची समस्या सतावतेय, फक्त ‘या’ छोट्या गोष्टींची घ्या काळजी
तुम्हाला कलिंगड खाण्याची योग्य वेळ माहिती आहे का? चला जाणून घेऊया तज्ञांचे मत…
महाराणा प्रताप यांचे वंशज अरविंद सिंह मेवाड यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन
Ratnagiri News – आगामी काळात शिवसेनेचे अस्तित्व दाखवूनच देऊ, अमोल किर्तीकर यांनी व्यक्त केला विश्वास