गौरीसोबतचं अफेअर मीडियापासून कसं लपवलं? खुद्द आमिर खाननेच केला खुलासा

गौरीसोबतचं अफेअर मीडियापासून कसं लपवलं? खुद्द आमिर खाननेच केला खुलासा

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आमिरने स्वत:च्या 60 व्या वाढदिवशी त्याच्या डेटिंग लाइफविषयी मोठा खुलासा केला. गौरी स्प्रॅट नावाच्या एका मैत्रिणीला डेट करत असल्याचं त्याने पापाराझींसमोर जाहीर केलं. इतकंच नव्हे तर त्याने गौरीची ओळखसुद्धा पापाराझींना करून दिली. दोन घटस्फोटानंतर वयाच्या साठाव्या वर्षी आमिरच्या रिलेशनशिपच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे आमिर आणि गौरी हे दोघं गेल्या 25 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात आणि गेल्या दीड वर्षापासून ते एकमेकांना डेट करतायत. सोशल मीडिया आणि पापाराझींचं एवढं कल्चर असतानाही आमिरने याबद्दल कोणाला कानोकान खबर लागू दिली नाही. आपलं रिलेशनशिप माध्यमांपासून कसं लपवलं, याबद्दलही आमिरने सांगितलं आहे.

आमिरने त्याच्या रिलेशनशिपला इतके महिने सर्वांपासून कसं लपवलं, हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. याबद्दल मीडियासोबत बोलताना आमिरने सांगितलं, “पाहिलंत.. मी तुम्हाला काहीच समजू दिलं नाही. ती बेंगळुरूमध्ये राहते. तिला भेटायला मी तिथे जायचो. तिथे जास्त मीडिया नसायची. त्यामुळे आमचं रिलेशनशिप सर्वांपासून लपून राहिलं. जेव्हा गौरी मुंबईत मला आणि माझ्या कुटुंबीयांना भेटायला आली, तेव्हा मीडियाने तिच्याकडे एवढं लक्ष दिलं नाही.” यावेळी सलमान खान आणि शाहरुख खानकडे लक्ष वेधत आमिर मस्करीत म्हणतो, “त्यांच्यामुळे माझ्या घरावर मीडियाचा थोडा फोकस कमी आहे. त्यामुळेच तुम्हाला माझ्या रिलेशनशिपबद्दल समजलं नाही.”

“आम्ही दोघं आता कमिटेड आहोत. माझ्याकडे आता लपवण्यासारखं काहीच नाही. जर मी गौरीसोबत कॉफी डेटवर गेलो तर तुम्हीसुद्धा आमच्यासोबत येऊ शकाल”, असं आमिर पापाराझींना म्हणाला. यावेळी त्याला गौरीसोबत तिसऱ्या लग्नाबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो हसत म्हणाला, “मी दोनदा लग्न केलंय. आता वयाच्या 60 व्या वर्षी तिसरं लग्न करणं कदाचित मला शोभणार नाही. परंतु बघू पुढे काय होतंय?”

आमिरने रिना दत्ताशी पहिलं लग्न केलं होतं. या दोघांना आयरा आणि जुनैद ही दोन मुलं आहेत. रिनाला घटस्फोट दिल्यानंतर आमिरने किरण रावशी दुसरं लग्न केलं. किरण आणि आमिरला आझाद हा मुलगा आहे. लग्नाच्या 16 वर्षांनंतर किरण आणि आमिरने 2021 मध्ये घटस्फोट घेतला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बदलत्या हवामानात फ्लूची समस्या सतावतेय, फक्त ‘या’ छोट्या गोष्टींची घ्या काळजी बदलत्या हवामानात फ्लूची समस्या सतावतेय, फक्त ‘या’ छोट्या गोष्टींची घ्या काळजी
मार्च महिना सुरू झाला असून दिवसा कडक उन्हाच्या झळा बसत आहेत, पण रात्री मात्र हवामानात थंडावा असल्याने उष्ण आणि थंड...
तुम्हाला कलिंगड खाण्याची योग्य वेळ माहिती आहे का? चला जाणून घेऊया तज्ञांचे मत…
महाराणा प्रताप यांचे वंशज अरविंद सिंह मेवाड यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन
Ratnagiri News – आगामी काळात शिवसेनेचे अस्तित्व दाखवूनच देऊ, अमोल किर्तीकर यांनी व्यक्त केला विश्वास
वादग्रस्त विधान भोवलं, उत्तराखंडच्या अर्थमंत्र्यांनी दिला राजीनामा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
पाण्यात अडकलेल्या म्हशीला बाहेर काढण्यासाठी गेले अन् बुडाले, एकाच कुटुंबातील पाच मुलांचा दुर्दैवी मृत्यू
बीडमधील दहशतवाद कधी थांबणार? जिल्ह्यातील सगळे अधिकारी बदलून टाका; अंजली दमानिया यांची मागणी