देवमाणूस परत येतोय, ‘देवमाणूस 3’ चा प्रोमो, किरण गायकवाड नसणार?
झी मराठीवरील काही मालिका इतक्या प्रसिद्ध असतात की त्या संपल्यानंतरही त्यांची चर्चा होताना दिसते. एवढंच नाही तर अशाही फार कमी मालिका आहे ज्यांचा एक भाग संपल्यानंतर दुसरा भाग निघाला आणि तोही प्रेक्षकांनी उचलून घेतला. अशीच एक मालिका म्हणजे ‘देव माणूस’. झी मराठीची ही मालिका खूप गाजली. या मालिकेतल्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. अभिनेता किरण गायकवाडने या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेचा आता तिसरा भाग सुरु होणार आहे. ही मालिका अशी होती की ज्याचे दोन्ही भाग तेवढेच गाजले.
‘देव माणूस 3’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
मालिकेत दाखवल्याप्रमाणे प्रत्येक आजारी माणसासाठी डॉक्टर हा देवमाणूसच होता. गावातले लोकं डॉक्टरला देव माणूस मानत असतं. या देवमाणसाची भूमिका म्हणजे डॉक्टर अजित कुमार देव याची भूमिका अभिनेता किरण गायकवाडने केली आहे. हा डॉक्टर गावकऱ्यांचा देवमाणूस असतो.पण त्याच देवमाणसाने अनेक हत्या केलेल्या दाखवल्या आहेत. या मालिकेचे दोन भाग आजवर प्रेक्षकांच्या भेटीला आले. दोन्ही भाग तितकेच गाजले. ‘देव माणूस’ या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘देव माणूस 3’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘देवमाणूस’ या मालिकेचा प्रोमो
झी मराठीच्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘देवमाणूस’ या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती काळोखात कपडे शिवत असल्याचं दिसत आहे. त्यानंतर शिवलेल्या कापडावर ‘देव माणूस’ असं लिहिलेलं दिसत आहे. शेवटी त्याच्यावर रक्ताचे डाग दिसतात. या प्रोमोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “मधला अध्याय सुरू होणार घरोघरी ‘देवमाणूस’ परत येतोय खबर आहे खरी, देवमाणूस – लवकरच.. आपल्या झी मराठीवर!”
प्रेक्षकांनी उत्सुकता नक्कीच वाढली
हा प्रोमो बघितल्यानंतर प्रेक्षकांनी उत्सुकता नक्कीच वाढली आहे. मालिकेचा तिसरा भाग पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे. ‘देवमाणूस’ च्या पहिल्या दोन्ही भागांमध्ये अभिनेता किरण गायकवाडने डॉक्टरची भूमिका साकारली होती. पण तिसऱ्या भागाच्या प्रोमोमध्ये किरण गायकवाड दिसला नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिसऱ्या भागातही किरण गायकवाड हवा, असं मत व्यक्त केलं आहे.
नव्या भागात काय ट्विस्ट असणार?
दरम्यान अभिनेता किरण गायकवाडने काही माहिन्यांपूर्वी अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरसोबत लग्न केलं. या मालिकेत दोघांनी एकत्र काम केलं होतं. आता तिसऱ्या भागात कोणते कलाकार झळकणार हे पाहावं लागेल. अनेकांनी हा प्रोमो बघितल्यावर शिव्यांचा आणि म्हणींचा खजिना असलेल्या सरु आजीचीही आठवण काढली आहे. तिसऱ्या भागात सरु आजीही असायलाच हवी, असंही काही लोकांनी म्हटलं आहे. नव्या भागात काय ट्विस्ट असणार, ते पाहणं आता प्रेक्षकांसाठी रंजक असणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List