होळीसाठी फुले आणायला निघालेल्या तरुणावर काळाचा घाला, बसची दुचाकीला समोरून धडक; दोन तरुण गंभीर जखमी

होळीसाठी फुले आणायला निघालेल्या तरुणावर काळाचा घाला, बसची दुचाकीला समोरून धडक; दोन तरुण गंभीर जखमी

होळीच्या पूजेसाठी दादर फुजबाजारात फुले आणण्यासाठी निघालेल्या एका तरुणावर काळाने घाला घातल्याचे तर अन्य दोघे तरुण गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना एल्फिन्स्टन उड्डाणपुलाजवळ घडली. पूल चढण्याआधी समोरून भरधाव आलेल्या एसटी महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसने त्या तरुणांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. यात प्रणय बोडके या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे ते तरुण राहत असलेल्या काळाचौकी परिसरात शोककळा पसरली आहे.

काळाचौकीच्या काळेवाडी येथे राहणारे जयेश मयेकर (26) तसेच सोसायटीच्या मंडळातील अशोक रावनक (44), सिद्धेश गोपाळ (38), दुर्वेश गोरडे (25), करण कुमार शिंदे (29) आणि प्रणय बोडके (29) असे सर्वजण बुधवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून दादर पश्चिमेकडील फुल बाजारात फुले आणण्यासाठी निघाले होते.

जयेश आणि सिद्धेश हे एका दुचाकीवर तर दुर्वेश, करण आणि प्रणय हे तिघे दुसऱया दुचाकीवरून जात होते. एल्फिन्स्टन उड्डाणपुलाजवळ ते आले असता समोरून वेगात आलेल्या एसटी महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसने आधी सिद्धेश चालवत असलेल्या दुचाकीला कट मारली. त्यानंतर पुढे जाऊन तिघे असलेल्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातामुळे तिघेही रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडले. तसेच दुचाकीचे मोठे नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी लगेच घटनास्थळी जाऊन तिन्ही जखमी तरुणांना केईएम इस्पितळात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून प्रणय बोडके याला मृत घोषित केले. तर करण आणि दुर्वेश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.

दरम्यान, बेदकारपणे बस चालवून अपघाताला जबाबदार असलेला बसचालक मतिन शेख (29) याला पोलिसांनी पकडले.  मतिन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या दुर्घटनेमुळे काळेवाडी येथील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. होळीच्या दिवशीच प्रणय, दुर्वेश आणि करण यांच्यासोबत दुर्घटना घडल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Video : स्मिता पाटील स्वप्नात येऊन लेकाच्या होणाऱ्या पत्नीला म्हणाल्या…; पाहा नेमकं प्रतिक बब्बरने काय सांगितलं Video : स्मिता पाटील स्वप्नात येऊन लेकाच्या होणाऱ्या पत्नीला म्हणाल्या…; पाहा नेमकं प्रतिक बब्बरने काय सांगितलं
अभिनेता प्रतिक बब्बरने प्रिया बॅनर्जीशी १४ फेब्रुवारी २०२५ रोजी विवाह केला. प्रतिक बब्बरची आई आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या...
इस मोहतरमा के साथ जहीर होली नही खेल सकता; ट्रोल करणाऱ्याला सोनाक्षीचे सडेतोड उत्तर
मंत्री विखेंसमोरच ‘छात्र भारती ‘च्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण, संगमनेरमध्ये संतापाची लाट
पुणे जिल्हा परिषदेत लाचखोरी, तीन अभियंत्यांना ‘एसीबी’ ने रंगेहाथ पकडले
निवडणुका नाहीत, मग पदे तरी द्या! डीपीसी, महामंडळासाठी कार्यकर्त्यांची याचना
Chandrapur News – रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकला ST बसची धडक, भीषण अपघातात वाहक ठार; कर्मचाऱ्यांचे आंदोलन
हे अतिच होतंय… 22 वर्षीय विद्यार्थिनीनं 18 कोटींना विकलं कौमार्य, हॉलीवूड अभिनेत्यानं खरेदी केल्याचा दावा