‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादः संघर्ष आणि संकल्प’ पुस्तकाची जनता आवृत्ती प्रसिद्ध करा! शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादः संघर्ष आणि  संकल्प’ पुस्तकाची जनता आवृत्ती प्रसिद्ध करा! शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस चिघळत आहे. अशा परिस्थितीत ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादः संघर्ष आणि संकल्प’ हे पुस्तक सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीच्या दृष्टीने इतके महत्त्वाचे आहे की, ते सर्वसामान्य मराठीजनांना सहज आणि स्वस्तात उपलब्ध व्हायला पाहिजे. म्हणून या पुस्तकाची जनता आवृत्ती शासनाने तातडीने प्रसिद्ध करावी आणि ही आवृत्ती किमान एक लाख प्रतींची असावी, अशी मागणी शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत निवेदन दिले आहे. महाराष्ट्र शासनाने 2021 साली ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद ः संघर्ष आणि संकल्प’ हा बृहद्ग्रंथ प्रसिद्ध केला होता. डॉ. दीपक पवार या पुस्तकाचे संपादक आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा समग्र आढावा घेणारा हा ग्रंथ शिवसेना पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध झाला. या पुस्तकात आपलेही मनोगत प्रसिद्ध झाले होते, अशी आठवणही देसाई यांनी या पत्रात करून दिली आहे.

मराठीजनांना पुस्तक सहज व स्वस्तात उपलब्ध करून द्या 

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस चिघळतोय. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात, सीमाभागात आणि बृहन्महाराष्ट्रात हे पुस्तक मराठीजनांना सहज व स्वस्तात उपलब्ध होणे गरजेचे आहे. म्हणून या पुस्तकाची जनता आवृत्ती शासनाने तातडीने प्रसिद्ध करावी अशी मागणी सुभाष देसाई यांनी केली आहे.

ज्ञानाची लढाई लढणेही महत्त्वाचे

आपण महाराष्ट्र दिन, मराठी भाषा दिन साजरा करतो, पण जोपर्यंत संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात येत नाही तोपर्यंत हे सर्व साजरे करणे अपुरे आहे या माझ्या भावनेशी आपणही सहमत व्हाल. राजकीय आणि न्यायालयीन लढाई आपण सीमाप्रश्नासाठी लढतच आहोत. पण त्याच बरोबरीने माहिती व ज्ञानाची लढाई लढणे आणि त्यात यशस्वी होणे हेही महत्त्वाचे आहे. यादृष्टीने जनता आवृत्ती हे महत्त्वाचे पाऊल ठरेल, असेही देसाई म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मी चुकीचे केले नाही त्यामुळे माफी मागणार नाही, ट्रम्पसोबतच्या वादानंतर झेलेन्स्की आपल्या भूमिकेवर ठाम मी चुकीचे केले नाही त्यामुळे माफी मागणार नाही, ट्रम्पसोबतच्या वादानंतर झेलेन्स्की आपल्या भूमिकेवर ठाम
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली. या भेटीच्या वेळी पत्रकारांसमोरच त्या...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 1 मार्च 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
एमबीबीएस प्रवेशात चांगल्या विद्यार्थ्यांचे पाय ओढले जातात, हायकोर्टाचे गंभीर निरीक्षण
अर्थसंकल्पात प्रोत्साहनपर योजनेच्या थकबाकीचा उतारा, शेतकरी कर्जमाफीची घोषणा कागदावर
तुम्हाला आयाबहिणी आहेत की नाहीत? मंत्री योगेश कदम, संजय सावकारे यांच्याविरोधात प्रचंड संताप
कोर्ट रूममध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग करणे पडले एक लाखाला, हायकोर्टाने गंभीर दखल घेतल्याने भरपाई देणार
काळोखाच्या सावल्या! पोलीस अमावास्येच्या रात्री घालतात गस्त, ब्रिटिशांनी सुरू केलेली परंपरा आजही जपली जातेय