दीपिका पदुकोणच्या लेकीला ही अजब सवय; अभिनेत्री सतत दुआबद्दल फोनवर काय सर्च करते? स्वतःच केला खुलासा
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या चित्रपटांमुळे, तिच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. ‘सिंघम अगेन’ चित्रपटामध्ये दीपिकाच्या हटके भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. पण त्यानंतर ती चर्चेत राहिली ते तिच्या प्रेन्गंसीमुळे आणि मुलीच्या जन्मानंतर. आजही चाहते तिच्या लेकीची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत. तिच्या लेकीचं नाव तिने दुआ असं ठेवलं असून सध्या ती तिचा सगळा वेळ तिच्या मुलीला देत आहे.
मुलाखतीत दीपिका तिच्या मानसिक आजारापासून ते आई होण्याच्या प्रवासापर्यंत सगळं बोलली
पण दीपिका तिच्या वेगवेगळ्या मुलाखतींमधून किंवा फोटोशूटमधून चाहत्यांच्या भेटीला येत असते. दीपिका नुकत्याच झालेल्या अबू धाबी येथील फोर्ब्स ग्लोबल समिटचा भाग राहिली होती. यावेळी तिने तिच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चा केली. या काळात दीपिकाने तिच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दलही बरंच काही सांगितलं. ती म्हणाली की मानसिक आरोग्य आजाराचा ती बळी ठरली होती तेव्हारासून तिच्यासाठी मनाची शांती असणं हा नेहमीच महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. याचं कारण स्पष्ट करताना तिने सांगितलं की मनाच्या शांततेपेक्षा महत्त्वाचं काहीही नाही. अभिनेत्री पुढे म्हणाली की हे करणे जितके सोपे वाटते तितके सोपे ते नाहीये, कारण त्यासाठी मेहनत घ्यावी लागते.
दीपिकाच्या लेकीला आहे ही अजब सवय
यासोबतच दीपिकाने तिच्या आई होण्याच्या प्रवासाबद्दलही सांगितलं. ती म्हणाली की तिच्या मनात नेहमीच तिच्या मुलीबद्दल अनेक विचार घोळत असतात. तसेच दीपिकाला तिच्या मुलीबद्दल बरेच प्रश्न विचारण्यात आले. तसेच तिला हेही विचारण्यात आलं की तिने गुगलवर शेवटचं काय सर्च केलं होतं. या प्रश्नावर दीपिकाने सांगितलं की तिने पालकत्वाशी संबंधित एक प्रश्न शोधला होता. तिने सांगितलं की , ‘तिची मुलगी थुंकणे कधी थांबवेल’ या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी तिने काही माहिती सर्च केली होती. दीपिकाने 8 सप्टेंबर 2024 रोजी मुलीला जन्म दिला.
दीपिकाच्या कामाबद्दल
अभिनेत्रीने सांगितले की ती सध्या सुट्टीच्या काळ हा तिच्या मुलीसोबत घालवत आहे. तसेच ती तिची झोपही पूर्ण करते. तिच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या वर्षी ती दोन चित्रपटांमध्ये दिसली, त्यापैकी एक कल्की 2898 एडी आणि दुसरा अजय देवगणचा सिंघम अगेन. तथापि, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी सिंघम अगेनमधील दीपिकाच्या व्यक्तिरेखेवर एक वेगळा चित्रपट बनवण्याबद्दल बोलले होते. तसेच ती आता पुन्हा कधी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची चाहते सध्या वाट पाहत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List