लग्नाच्या ड्रेसनंतर समंथाने पूर्व पतीची आणखी एक आठवण मिटवली; पहा काय..

लग्नाच्या ड्रेसनंतर समंथाने पूर्व पतीची आणखी एक आठवण मिटवली; पहा काय..

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. समंथाने अभिनेता नाग चैतन्यशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या चार वर्षांतच या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नाग चैतन्यने अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी दुसरं लग्न केलं. नाग चैतन्यसोबतच्या घटस्फोटानंतर समंथाने त्याच्यासोबतच्या एकेक आठवणी पुसण्याचा प्रयत्न केला आहे. काही महिन्यांपूर्वी तिने लग्नातील व्हाइट गाऊनपासून नवीन काळ्या रंगाचा ड्रेस बनवला होता. असं करून समंथाने तिचा सूड घेतला, अशा प्रतिक्रिया त्यावेळी चाहत्यांनी दिल्या होत्या. त्यानंतर आता समंथाने तिच्या साखरपुड्याच्या अंगठ्यापासून नवीन गोष्ट बनवल्याचं म्हटलं जातंय. ज्वेलरी इन्फ्लुएन्सर ध्रुमित मेरुलियाने समंथाच्या साखरपुड्याच्या अंगठीबाबत हा दावा केला आहे.

ध्रुमित मेरुलियाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने म्हटलंय की नाग चैतन्यने साखरपुड्यानिमित्त समंथाला तीन कॅरेट प्रिन्सेस कट डायमंड रिंग भेट म्हणून दिली होती. आता त्याच रिंगपासून समंथाने पेंडंट बनवल्याचा दावा ध्रुमितने केला आहे. समंथाच्या गळ्यातील चेनमध्ये अगदी तसंच पेंडंट पहायला मिळतंय. प्रिन्सेस कट डायमंडपासून तिचं हे पेंडंट बनवलं गेलंय. ध्रुमितच्या या व्हिडीओवर अद्याप समंथाने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही किंवा साखरपुड्याच्या अंगठीपासून पेंडंट बनवल्याचं तिने सोशल मीडियावर सांगितलं नाही.

काही महिन्यांपूर्वी समंथाने तिच्या लग्नाच्या गाऊनला कात्री लावत त्यापासून नवीन ड्रेस बनवला होता. नाग चैतन्यसोबतच्या ख्रिश्चन लग्नात समंथाने जो गाऊन परिधान केला होता, त्याला तिने वेगळं रुप दिलं होतं. यामागील कारणसुद्धा समंथाने एका मुलाखतीत सांगितलं होतं. “मी असं का केलं यामागचं कारण म्हणजे मला खरंच त्या गाऊनला एक वेगळं रुप द्यायचं होतं आणि सुरुवातीला मला त्रास नक्की झाला होता. मला वेदना जाणवत होत्या पण मी त्यापासून नवीन काहीतरी बनवण्याचा निर्णय घेतला. होय, मी विभक्त झाले आहे आणि माझा घटस्फोट झाला आहे. गोष्टी परीकथेसारख्या नाहीत पण याचा अर्थ असा नाही की एका कोपऱ्यात बसून त्याबद्दल रडत बसावं आणि आयुष्यात पुन्हा कधीच आनंदाने जगू नये”, असं समंथा म्हणाली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘तारक मेहता..’मध्ये अखेर दयाबेन परततेय; शूटिंगलाही सुरुवात ‘तारक मेहता..’मध्ये अखेर दयाबेन परततेय; शूटिंगलाही सुरुवात
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. गेल्या 17-18 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय....
पलक तिवारीला अनन्या पांडे म्हणताच तिचा पारा चढला; पापारांझींना चिडून म्हणाली,”तुम्ही दरवेळी…”
Exclusive: दिशा सालियान १४व्या मजल्यावरून पडली तेव्हा अंगावर कपडे… तिघांनी पाहिले
तुमच्या आई-बहिणीचा व्हिडीओ पहा..; कास्टिंग काऊचची क्लिप शेअर करणाऱ्यांवर भडकली अभिनेत्री
मोठी बातमी! अभिनेत्री दिशा पटाणीमुळे वाढले होते दिशा सालियानचे टेन्शन, नेमकं काय झालं होतं?
सलमान खानने सरळ हात जोडले अन्… म्हणाला ,’मी खूप वादांमधून गेलोय पण आता….”
विठ्ठलभक्तांना खोल्या नोंदणीसाठी संगणक प्रणाली विकसित