कधी विकला वडापाव, कधी पुसली लादी..; ‘छावा’च्या दिग्दर्शकाचा संघर्षमयी प्रवास

कधी विकला वडापाव, कधी पुसली लादी..; ‘छावा’च्या दिग्दर्शकाचा संघर्षमयी प्रवास

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. प्रदर्शनाच्या पंचविसाव्या दिवशीही या चित्रपटाची जोरदार कमाई सुरूच आहे. यामध्ये विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली असून मराठमोळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. उतेकर यांचा हा पाचवा यशस्वी चित्रपट ठरला आहे. याआधी त्यांनी ‘लुका छुपी’, ‘जरा हटके जरा बचके’, ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’, ‘मिमी’ यांसारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. आता ‘छावा’मुळे केवळ भारतातच नाही तर जगभरात ते लोकप्रिय ठरत आहेत. मात्र चित्रपटसृष्टीत नाव कमावणं हे उतेकरांसाठी सहजसोपं कधीच नव्हतं.

दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचे तीन चित्रपट हे 100 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट आहेत आणि त्यांच्या आताच्या ‘छावा’ने तर थेट 700 कोटींचा गल्ला जमवला आहे. उतेकरांचे हे चित्रपट कोट्यवधींची कमाई करणारे असले तरी त्यांनी सुरुवातीच्या काळात बराच संघर्ष केला आहे. त्यांचा जन्म एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांच्या कुटुंबीयांचा चित्रपटसृष्टीशी काहीच संबंध नव्हता. उतेकर हे आपल्या मेहनतीच्या जोरावर इथवर पोहोचले. घरची परिस्थिती सर्वसामान्य असल्याने त्यांनी सुरुवातीला अनेक प्रकारची कामं केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Laxman Utekar (@laxman.utekar)

सुरुवातीच्या दिवसांत उतेकरांनी फिल्म स्टुडिओची लादी पुसली, वडापाव विकून पैसे कमावले. फिल्म स्टुडिओमध्ये छोटी-मोठी कामं करताना ते दिग्दर्शन प्रक्रियेबद्दल जाणून घेऊ लागले. दिग्दर्शक क्षेत्रातील प्रत्येक बारकावे ते शिकले आणि आता ते सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शक बनले आहेत.

लक्ष्मण उतेकर यांना त्यांच्या करिअरमधील मोठा ब्रेक 2019 मध्ये ‘लुका छुपी’ या चित्रपटातून मिळाला. यामध्ये कार्तिक आर्यन आणि कृती सनॉन यांच्या मुख्य भूमिका होत्या. अवघ्या 25 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. त्यानंतर 2021 मध्ये उतेकरांनी पुन्हा एकदा कृती सनॉनसोबत काम केलं. सरोगसीबद्दलची कथा सांगणाऱ्या ‘मिमी’ या चित्रपटाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून प्रचंड कौतुक झालं. या चित्रपटातील अभिनयासाठी क्रितीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दोन कोटींची मागणी करत सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण, शाळेत सोडणारा रिक्षावाला निघाला अपहरणकर्ता दोन कोटींची मागणी करत सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण, शाळेत सोडणारा रिक्षावाला निघाला अपहरणकर्ता
Crime News: दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी शाळेत सोडणाऱ्या रिक्षावाल्यानेच त्याचा साथीदारांसोबत एका सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण केले. मुलाचे अपहरण झाल्याची...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 29 मार्च 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
शेतकऱ्यांना यंदा आणि पुढच्या वर्षी पीक कर्जमाफी मिळणार नाही! अजित पवार यांनी पलटी मारली
शाहीर, जादूगार, शिल्पकारांची पेन्शन वर्षभरापासून बंद! शिवसेनेने केद्राकडे उठवला आवाज; तत्काळ पेन्शन सुरू करण्याची मागणी
मोदीजी, सांगा त्या सौगातचे काय झाले? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
स्वातंत्र्याला 78 वर्षे झालीत, आता तरी भडकावू भाषणे बंद करा; हायकोर्टाचे गंभीर निरीक्षण
वित्तीय तूट भरून काढण्यासाठी एमएमआरडीएची जमीन विक्री