‘आई तुळजाभवानी’ मालिकेत ‘आईराजा’ अध्याय; देवीच्या राज्याभिषेकाचा शुभारंभ
कलर्स मराठी वाहिनीवरील 'आई तुळजाभवानी' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. आता प्रत्येक देवीभक्तासाठी विशेष ठरणारा ‘आईराजा’ अध्याय ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत सुरू होतो आहे.
देवी पार्वतीचा अवतार असलेल्या आई तुळजाभवानीचे यमुनांचल पर्वतरांगांतील वास्तव्य आणि प्रजेच्या कल्याणासाठी तिचे निर्माण झालेले अढळस्थान या कथानकाचा कळस म्हणजे तुळजापुरातील ‘आईराजा’ अधिष्ठानाची स्थापना.
या भव्य अध्यायात देवीचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. सर्व देव, ऋषि-मुनी, गुरु महादेव आणि सर्वसामान्य जनतेच्या साक्षीने देवीने राज्याभिषेकाला मान्यता दिली असून, हा ऐतिहासिक सोहळा मालिकेत उत्कंठा वाढवणारा आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List