म्यानमार-थायलंड शक्तिशाली भूकंपानं हादरलं, बँकॉकमध्ये आणीबाणी; मोदींचा दौरा रद्द होण्याची शक्यता, सकाळीच झालेली घोषणा

म्यानमार-थायलंड शक्तिशाली भूकंपानं हादरलं, बँकॉकमध्ये आणीबाणी; मोदींचा दौरा रद्द होण्याची शक्यता, सकाळीच झालेली घोषणा

म्यानमार आणि थायलंड शुक्रवारी शक्तिशाली भूकंपाने हादरले आहे. 7.7 रिक्टर स्केलच्या भूकंपामुळे दोन्ही देशांमध्ये मोठी हानी झाली आहे. अनेक निर्माणाधीन इमारती, पूल कोसळले आहेत. घरांच्या भिंतीलाही तडे गेले असून रस्त्यांनाही भेगा पडल्या आहेत. काही लोक बेपत्ता असल्याचेही वृत्त आहे. या शक्तिशाली भूकंपानंतर थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. शहरात लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

शुक्रवारी सकाळी म्यानमारमध्ये शक्तिशाली भूकंप झाला. म्यानमारमधील Sagaing हे भूकंपाचे केंद्र आहे. या भूकंपाची तीव्रता एवढी होती की म्यानमारमधील मंडाले येथील इरावती नदीवरील जगप्रसिद्ध एवा पूलही कोसळल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. तसेच चीन, तैवान आणि बांगलादेशच्या काही भागातही या भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृत्त आहे.

7.7 एवढ्या तीव्रतेच्या भूकंपामुळे थायलंड आणि म्यानमारमधील अनेक इमारती अक्षरश: पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. बँकॉकमध्ये निर्माणाधीन टॉवर्सही कोसळले असून एकाचा मृत्यू तर जवळपास 50हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. या भूकंपानंतरचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. इमारती कोसळत असताना लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत असल्याचे यात स्पष्ट दिसते.

बँकाकमध्ये आणीबाणी

थायलंडची राजधानी बँकाकमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. संपूर्ण शहर लॉकडाऊन करण्यात आले असून मेट्रो सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. शेअर बाजारातील ट्रेडिंगही थांबवण्यात आले असून विमानतळ आणि सब वे देखील बंद करण्यात आले आहेत.

मोदींचा दौरा रद्द होण्याची शक्यता

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 ते 6 एप्रिल दरम्यान थायलंड आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार होते. बँकॉकमध्ये होणाऱ्या बिम्सटेक शिखर संमेलनात ते सहभागी होणार होते. शुक्रवारी सकाळीच या दौऱ्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र भूकंपामुळे हा दौरा रद्द होण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘माहेरी प्रेम मिळालं, सासरी मात्र…’, सोनाक्षी सिन्हाला लग्नानंतर सासू – सासरे कशी देतात वागणूक? ‘माहेरी प्रेम मिळालं, सासरी मात्र…’, सोनाक्षी सिन्हाला लग्नानंतर सासू – सासरे कशी देतात वागणूक?
Sonakshi sinha on her relationship with inlaws: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते....
वाढदिवसाच्या एक दिवस आधी जीवन संपवलं; IIIT अलाहाबादच्या विद्यार्थ्याचा हॉस्टेलवर मृत्यू
परीक्षेला बसू न दिल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या; 800 रुपये फी न भरल्याचे कारण
Kunal Kamra कोणताही छुपा हेतू नाही! ‘गद्दार’ विडंबनावर प्रशांत किशोर यांचा कुणाल कामराला पाठिंबा
मराठी माणसा एक हो…यंदाच्या सोहळ्याची संकल्पना माय मराठी
ठाणे, रायगड, पालघरमध्ये जल्लोष, शोभायात्रांचे आकर्षण
बिहारमध्ये पुन्हा नितीश कुमार यांच्याच नेतृत्वाखाली लढणार, अमित शहा यांनी खेळली महाराष्ट्राची चाल