अ‍ॅमेझॉनच्या गोदामात सापडली नकली उत्पादने

अ‍ॅमेझॉनच्या गोदामात सापडली नकली उत्पादने

देशातील सर्वोच्च उत्पादन प्रमाणन एजन्सी असलेल्या द ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने (बीआयएस) दिल्लीत अॅमेझॉनसारख्या काही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म कंपन्यांच्या गोदामांवर धाडी टाकल्या. या धाडीत बीएसआय प्रमाणपत्रं नसलेली सुमारे साडेतीन हजारांहून अधिक उत्पादने  जप्त करण्यात आली. तब्बल 70 लाख रुपये किमतीची ही उत्पादने आहेत. उत्पादनांच्या दर्जासंदर्भातील नियमांचे पालन व्हावे आणि ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी सध्याची मोहीम राबवली जात असल्याचे बीआयएसने सांगितले. आठवडय़ाच्या सुरुवातीला अॅमेझॉनच्या मोहन को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रीयल एरियातील गोदामांवर शोध आणि जप्तीची मोहीम राबवण्यात आली. 15 तास हे ऑपरेशन चालले आणि त्यात  आयएसआय लेबल नसलेली आणि नकली आयएसआय लेबल लावलेली साडेतीन हजार उत्पादने जप्त करण्यात आल्याचे बीआयएसने निवेदनाद्वारे सांगितले. या उत्पादनांमध्ये गिझर, फूड मिक्सर आणि अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नोव्हाक जोकोविचचे जेतेपदांचे शतक हुकले, 19 वर्षीय याकूब मेन्सिकने जिंकला मियामी ओपनचा किताब नोव्हाक जोकोविचचे जेतेपदांचे शतक हुकले, 19 वर्षीय याकूब मेन्सिकने जिंकला मियामी ओपनचा किताब
गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या शतकी एटीपी जेतेपदासाठी संघर्ष करत असलेल्या नोव्हाक जोकोविचचे जेतेपदांचे शतक पुन्हा एकदा हुकले. झेक प्रजासत्ताकचा नव्या...
पंतच्या लखनौपुढे अय्यरच्या पंजाबचे आव्हान
देशातील पहिला नर्सिंग एक्सलन्स ट्रेनिंग प्रोग्राम लीलावतीत यशस्वी
दहावी नंतर पुढे काय? जागृती मंच कडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
डॉ. आंबेडकर विधी कॉलेजला उपविजेतेपद
कळविण्यास दु:ख होते की… राजेंद्र मोरवाले यांचे निधन
आधी सिलेंडर फुटला, मग फटाक्यांचा स्फोट; 7 जणांचा मृत्यू; काही जण जखमी