मेरठ हत्याकांडला घाबरून घेतला निर्णय, पतीनेच लावले पत्नीचे तिच्या प्रियकरासोबत लग्न
उत्तर प्रदेशमधील मेरठ शहरात एका विवाहित तरुणीने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची अत्यंत भयंकर पद्धतीने हत्या केली आहे. या प्रकरणामुळे सर्वत्र भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे. याच भीतीपोटी उत्तरप्रदेशातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीचे तिच्या प्रियकरासोबत लग्न लाऊन दिले. आपल्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्याने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण धनघाटा पोलिस स्टेशन परिसरातील कटार गावातील आहे. येथे राहणाऱ्या बबलूने सोमवारी त्याची पत्नी राधिकाचे लग्न तिचा प्रियकर विशाल कुमारशी लावून दिले. बबलू हा व्यवसायाने मजूर आहे. त्याने 2017 मध्ये गोरखपूर येथील रहिवासी राधिकाशी लग्न केले आणि या दोघांना दोन मुले देखील आहेत.
गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार, राधिकाचे गेल्या दीड वर्षांपासून तिच्याच गावातील विशालसोबत प्रेमसंबंध होते. मात्र जेव्हा बबलूला हे कळले तेव्हा त्याने राधिकाला नाते संपवण्यास सांगितले. पण राधिकाने त्याला नकार दिला. त्यामुळे वाद घालण्याऐवजी, बबलूने शांततेने परिस्थिती सोडवण्याचा निर्णय घेतला. त्याने स्वतःच आपल्या पत्नीचे लग्न तिच्या प्रियकरासोबत लावण्याचा निर्णय घेतला. सोमवारी 24 मार्च रोजी तो राधिका आणि विशालसोबत धनघाटा तहसीलमध्ये पोहोचला. तिथे या दोघांच्याही लग्नाची कायदेशीर कागदपत्रे तयार करण्यात आली. यानंतर, गावातील लोकांच्या उपस्थितीत दोघांचेही लग्न मंदिरात करण्यात आले.
मी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला- बबूल
‘मी माझ्या पत्नीला अनेक वेळा समजवण्याचा प्रयत्न केला होता, पण तिने ऐकले नाही. अलिकडेच मेरठमध्ये एका महिलेने तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची हत्या केली आणि मृतदेह ड्रममध्ये लपवून ठेवला. हे सर्व पाहून मला भीती वाटू लागली की हे माझ्यासोबतही घडेल. म्हणून, आम्ही दोघेही शांततेत राहू शकू म्हणून मी स्वतः त्यांचे लग्न लावून दिले, असे यावेळी बबूल म्हणाला.
आधी झोपेच्या गोळ्या दिल्या नंतर शरीराचे 15 तुकडे केले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List