शुभमन गिलला डेट करतेय ‘ही’ 23 वर्षांची अभिनेत्री? ‘त्या’ व्हिडीओवर अनेकांचा संताप, नक्की काय आहे प्रकरण?

शुभमन गिलला डेट करतेय ‘ही’ 23 वर्षांची अभिनेत्री? ‘त्या’ व्हिडीओवर अनेकांचा संताप, नक्की काय आहे प्रकरण?

Actress Date Cricketer Shubman Gill: भारतीय क्रिकेट संघाचा दमदार खेळाडू शुभमन गिल कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो. 9 मार्च रोजी दुबईमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर देखील शुभमन त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. आता शुभमन याचं नाव सारा अली खान किंवा सारा तेंडुलकर यांच्यासोबत नाही तर, एका 23 वर्षीय अभिनेत्रीसोबत जोडण्यात येत आहे. सध्या अभिनेत्रीने पोस्ट केलेला व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला. तर अनेकांना व्हिडीओ आवडलेला आहे.

शुभमन गिल याच्यासोबत सध्या ज्या अभिनेत्रीच्या नावाची चर्चा रंगली आहे आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री अवनीत कौर आहे. अवनीतने भारताच्या समर्थनार्थ काही फोटो शेअर केलं, मात्र चाहत्यांनी तिला ट्रोल केलं. लोक शुभमनला ‘जीजू’ म्हणत चिडवू लागले. क्रिकेटरला इम्प्रेस करण्यासाठी ती तिथे गेली होती, असे काहींनी सांगितलं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Avneet Kaur (@avneetkaur_13)

गेल्या अनेक दिवसांपासून शुभमन आणि अवनीत यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण दोघांनी देखील नात्यावर अधिकृत घोषणा केलेली नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंड संघाचा पराभव केल्यानंतर अवनीत हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यावर अनेकांना संताप व्यक्त केला आहे.

सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाही, जेव्हा अवनीत हिला ट्रोल करण्यात आलंय. अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी अवनीत आणि राघव शर्मा यांच्या नात्याची बरीच चर्चा झाली होती. दोघेही वर्षानुवर्षे रिलेशनशिपमध्ये आहेत, पण करिअरवर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्यांनी ते लपवून ठेवल्याच्या चर्चांना देखील उधाण आलं होतं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Avneet Kaur (@avneetkaur_13)

 

टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री अवनीत कौर (Avneet Kaur) फक्त अभिनेत्री नाही तर, सोशल मीडिया स्टार देखील आहे. अवनीत तिच्या फॅशन सेन्समुळे देखील कायम चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या बोल्ड अदा आणि अन्य कोणत्या कारणामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नेपाळमध्ये राजेशाहीवरून हिंसाचार; दोघांचा मृत्यू नेपाळमध्ये राजेशाहीवरून हिंसाचार; दोघांचा मृत्यू
नेपाळमध्ये राजेशाही परत आणण्याच्या मागणीसाठी नागरिकांची निदर्शने सुरू असतानाच अचानक आंदोलनाला हिंसक वळण लागले. हिंसाचारात सबीन महाराजन आणि सुरेश राजक...
रेल्वेची आरक्षण प्रणाली चार तास बंद राहणार
म्यानमार-थायलंडला भूकंपाचा तडाखा, 144 जणांचा मृत्यू, 800 हून अधिक जखमी
IPL 2025 – रजत पाटीदारच्या RCB ने 17 वर्षांनी ‘चेपॉक किल्ला’ भेदला, चेन्नईचा 50 धावांनी उडवला धुव्वा
बाळाच्या काळजीने आईचे काळीज का कठोर झाले?, पोटावर विळ्याचे ६५ चटके, अखेर देवदूत म्हणून डॉक्टरचे पुढे आले….
बॉलीवूड देखील पॉलिटीकलदृष्ट्या विभागला गेला आहे का? काय म्हणाली यामी गौतम ?
सरकारी बाबूंचा ‘लंच टाईम’ फक्त अर्ध्यातासाचा! जेवणाच्या नावाखाली कर्मचारी गायब असेल तर दाखवा “हे” परिपत्रक