कोण आहे गौरी स्प्रॅट, 3 मुलांचा बाप आमिर खानसोबत करणार लग्न?
अभिनेता आमिर खान याने वयाच्या 60 व्या वर्षी मोठी घोषणा करत सर्वांना चकित केलं आहे. एका महिलेला अभिनेत्याने जोडीदार म्हणून घोषित केलं आहे. आता आमिर खान याच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. बॉलीवूडच्या सुपरस्टारने 13 मार्च रोजी मुंबईत मीडियासोबत एका अनौपचारिक प्री-बर्थडे गेट-टूगेदरमध्ये गौरीची ओळख करून दिली. मात्र या दोघांचा एकही फोटो समोर आलेला नाही. त्याने पापाराझींना गौरीचे फोटो न काढण्याचे आवाहन केलं होतं. रिपोर्टनुसार, आमिर आणि गौरी गेल्या वर्षभरापासून एकमेकांना डेट करत आहेत.
फिल्मफेअरच्या रिपोर्ट्सनुसार, आमिर आणि गौरीचा रोमान्स एक वर्षापूर्वी सुरू झाला. पण ते एकमेकांना 25 वर्षांपासून ओळखतात. आमिरने गौरीची ओळख करून दिली असेल, पण लोक गौरीला ओळखत नाही. गौरीच्या कुटुंबियांबद्दल आणि तिच्या कामाबद्दल फार कोणाला माहिती नाही.
गौरी स्प्रॅट कोण आहे?
गौरी स्प्रॅट ही मूळची बेंगळुरूची असून ती आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊस आमिर खान फिल्म्समध्ये बऱ्याच दिवसांपासून काम करत आहे. तिने हेअरड्रेसिंगमध्ये काम केले आहे. तिने लंडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्समधून फॅशन, स्टाइलिंग आणि फोटोग्राफीमध्ये एफडीए केलं आहे. गौरीची आई तामिलियन असून वडील आयरिश आहेत. तिचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. गौरी 6 वर्षांच्या मुलाची आई देखील आहे.
दरम्यान, आमिर खान याने गौरीबद्दल मोठं वक्तव्य केलं. गौरी आता हळू हळू बॉलिवूड सिनेमे पाहण्याची सवय करून घेत आहे. शिवाय आमिर कुटुंबियांनी देखील गौरीचा आनंदाने स्वीकार केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आमिर खान याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
आमिर खान याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने 1986 मध्ये रीना दत्ता हिच्यासोबत लग्न केलं. रीना आणि आमिर यांना दोन मुलं देखील आहेत. आमिर आणि रीना यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2005 मध्ये आमिर याने किरण राव हिच्यासोबत लग्न केलं. किरण हिला देखील एक मुलगा आहे.
अभिनेत्याचं दुसरं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी देखील घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली. आमिर आणि किरण यांचा घटस्फोट झाला असला तरी अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट केलं जातं. आमिर खान याचे दोन्ही पत्नींसोबत आजही चांगले संबंध आहेत. आता अभिनेता तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List