कोलंबिया विद्यापीठानं माझा विश्वासघात केला; अमेरिकेतून ‘सेल्फ डिपोर्ट’ झालेल्या हिंदुस्थानी विद्यार्थिनीनं सांगितली आपबिती
कोलंबिया विद्यापीठात डॉक्टरेटची विद्यार्थिनी असलेल्या रंजनी श्रीनिवास (वय – 37) हिचा व्हिसा अमेरिकेने काही दिवसांपूर्वी रद्द केला होता. हमास या दहशतवादी संघटनेला पाठिंबा दिल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव तिचा व्हिसा रद्द करण्यात आल्याचे अमेरिकेच्या गृह विभागाने म्हटले होते. यानंतर रंजनीने ‘सेल्फ डिपॉर्ट’ (स्वत:हून देश सोडण्याचा निर्णय) होण्याचा निर्णय घेतला होता. आता रंजनीने तिच्यावर ओढावलेला प्रसंग कथन केला असून कोलंबिया विद्यापीठाने माझा विश्वासघात केला असा आरोप केला आहे.
कोलंबिया विद्यापीठामध्ये मी 5 वर्ष काम काम केले. मला आठवत नाही, मी कधीकधी आठवड्यातून 100 तासांहून अधिक कामही केले. पण मला कधीच वाटले नव्हते की ही संस्था मला निराश करेल, पण तसे झाले, असे रंजनी श्रीनिवासन ‘अल जझीरा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाली. मला आशा आहे कोलंबिया विद्यापीठाचे डोळे उघडतील आणि ते मला पुन्हा प्रवेश देतील. अर्थात माझ्या पीएचडीसाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि ते काही बाकी आहे त्यासाठी मला अमेरिकेमध्ये राहण्याचीही गरज नाही, असेही ती म्हणाली.
रजनी श्रीनिवासन ही अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून पीएचडी करत होती. एफ-1 स्टुडंट व्हिसावर तिला अमेरिकेमध्ये प्रवेश मिळाला होता. मात्र हमास या दहशतवादी संघटनेला पाठिंबा देणाऱ्या कारवायांमध्ये ती सहभागी असल्याचा ठपका ठेवत 5 मार्च रोजी तिचा व्हिसा रद्द करण्यात आला होता. यानंतर तिने ‘सेल्फ डिपॉर्ट’ होत कॅनडा गाठले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List