KBC: मी शेवटचं सांगत आहे…; बिग बींनी सांगितले केबीसी कोण होस्ट करणार
माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणून कौन बनेगा करोडपती पाहिला जातो. गेल्या कित्येक वर्षांपासून या शोचे बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करताना दिसत होते. सध्या केबीसीचा १६वा सिझन शेवटच्या टप्प्यामध्ये सुरु आहे. बिग बी या शेवटच्या भागांचे सूत्रसंचालन करताना भावूक होत आहेत. या पुढचे सिझन कोण होस्ट करणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अमिताभ यांनी स्वत: याविषयी माहिती दिली आहे.
काही दिवसांपूर्वी एक रिपोर्ट समोर आला होता. या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की अमिताभ बच्चन ‘केबीसी’ या शोमधून रिटायर होणार आहेत. त्यानंतर शाहरुख खान, एमएस धोनी किंवा ऐश्वर्या राय बच्चन हा शो होस्ट करणार असल्याची चर्चा रंगली होती. केबीसीच्या ग्रँड फिनालेच्या दिवशी अमिताभ यांनी यावर वक्तव्य करत चर्चांना पूर्णविराम दिला. ते स्वत: केबीसीचा पुढचा सिझन होस्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अमिताभ म्हणाले, ‘प्रत्येक सिझन सुरु होण्यापूर्वी मी विचार करतो की इतकी वर्षे उलटली असली तरी तेच प्रेम, तिच साथ, तिच आपुलकी तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात कशी पाहायला मिळते? प्रत्यके सिझनच्या शेवटी या खेळाने, या मंचाने मला जे हवय त्यापेक्षा जास्त मिळवून दिले आहे असे वाटते. मला अशा आहे की हे असच सुरु राहिल. कधीही संपणार नाही.’
पुढे अमिताभ बच्चन म्हणाले की, ‘मी तुम्हाला शेवटचे सांगू इच्छितो की आमच्या प्रयत्नांमुळे कोणाचे आयुष्य बदलले आणि किंवा आमच्यामुळे कोणाला नवी प्रेरणा मिळाली आहे तर मी समझेन मी आमची २५ वर्षांची मेहनत यशस्वी ठरली. मी तुम्हाला पुढच्या सिझनमध्ये भेटतो. पण तुम्ही तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. कधीही थांबू नका आणि कोणासमोर वाकू नका. तुम्ही जेथे कुठे आहे, ज्या परिस्थितीमध्ये आहात आमच्यासाठी ते फार महत्त्वाचे आहे. लवकरच पुन्हा भेटूया.’
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List