Champions Trophy 2025 – रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीच्या फिटनेसची चाहत्यांना चिंता, श्रेयस अय्यरने दिली महत्त्वाची अपडेट
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने पहिल्या सामन्यापासून आपलं नाण खणखणीत वाजवलं आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेशला धुळ चारल्यानंतर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचाही टीम इंडियाने 6 विकटने फडशा पाडला आहे. त्यामुळे टीम इंडियाचे सेमी फायनलमधील स्थान जवळपास निश्चित मानलं जात आहे. परंतु पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी काही वेळासाठी मैदानातून बाहेर गेले होते. त्यामुळे त्यांच्या तंदुरुस्थी संदर्भात उलट सुलट चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत.
पाकिस्तानविरुद्ध सामना सुरू असताना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे दोघेही काही वेळासाठी मैदानातून बाहेर गेले होते. त्यांच्या जागी इतर खेळाडू मैदानात क्षेत्ररक्षण करत होते. त्यामुळे दोघांच्याही फिटनेसवर प्रश्न निर्माण केला जात होता. त्यामुळे पुढच्या सामन्यात दोघे खेळणार का नाही? याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. परंतु यासंदर्भात श्रेयस अय्यरने सामना संपल्यानंर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे. त्याला यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा तो म्हणाला की, दोन्ही खेळाडू तंदुरुस्त असून त्यांना कुठलाही त्रास नाही. त्यामुळे पुढच्या सामन्यात दोघेही खेळताना दिसतील. टीम इंडियाचा साखळी फेरीतील एक सामना बाकी असून 2 मार्च रोजी टीम इंडिया न्यूझीलंडला भीडणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List