एलोन मस्कचे X दिवसभरात तिसऱ्यांदा ठप्प, युजर्सने नोंदवल्या तक्रारी

एलोन मस्कचे X दिवसभरात तिसऱ्यांदा ठप्प, युजर्सने नोंदवल्या तक्रारी

एलोन मस्क यांचे मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्स सोमवारी सायंकाळी जगभरात पुन्हा एकदा डाऊन झाले. दिवसभरात तीन वेळा एक्स ठप्प झाले. यामुळे युजर्सना लॉग इन करण्यास अडचणी येत होत्या. याबाबत युजर्सनी डाऊन डिटेक्टर वेबसाईटवर तक्रार दाखल केली आहे.

डाउन डिटेक्टर वेबसाइटनुसार, दुपारी 3.30 वाजता पहिल्यांदा एक्स ठप्प झाले. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता युजर्सना लॉग इन करण्यात समस्या येऊ लागल्या. तिसऱ्यांदा, रात्री 8.44 वाजता X पुन्हा डाऊन झाले. वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांना अॅप आणि साइटवर समस्या येऊ लागल्या.

युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि भारतासह अनेक देशांनी युजर्सनी X बद्दल तक्रार केली. जगभरात 40,000 हून अधिक युजर्सनी तक्रार केली आहे. डाउन डिटेक्टर वेबसाइटच्या अहवालानुसार, 56 टक्के वापरकर्त्यांना अॅपमध्ये, 33 टक्के वापरकर्त्यांना वेबसाइटमध्ये तर 11 टक्के लोकांनी सर्व्हर कनेक्शनमध्ये समस्या असल्याचे नोंदवले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘सैराट’ पुन्हा याड लावायला येतोय… ‘सैराट’ पुन्हा याड लावायला येतोय…
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटातील अजय-अतुल यांच्या गाण्यांनी तसेच आर्ची-परशाच्या जोडीने सर्वांनाच याड लावलं. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला नऊ वर्षे...
चॅम्पियन रोहित शर्माचं मुंबईत जंगी स्वागत, विमानतळावर चाहत्यांची जमली गर्दी
एलोन मस्कचे X दिवसभरात तिसऱ्यांदा ठप्प, युजर्सने नोंदवल्या तक्रारी
बुडीत बँकांच्या पाच लाखांहून अधिक ठेवी असलेल्यांवर आता दुहेरी संकट, पाहा काय घडले?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरावर दगडफेक, RSS कडून शक्तीप्रदर्शन करत…
इंग्लंडजवळील उत्तर समुद्रात तेलवाहू जहाज आणि मालवाहू जहाजांमध्ये टक्कर, दुर्घटनेत 23 जणांचा मृत्यू; बचाव कार्य सुरू
यंदा अर्थसंकल्प सादर करताना गुलाबी जॅकेट का नाही घातलं? अजित पवार यांनी दिले उत्तर