Rohit Sharma Net Worth: मुंबईमध्ये आलीशान घर…, प्रत्येक महिन्यात 2 कोटींची कमाई! हिटमॅन रोहित शर्माची नेटवर्थ किती?

Rohit Sharma Net Worth: मुंबईमध्ये आलीशान घर…, प्रत्येक महिन्यात 2 कोटींची कमाई! हिटमॅन रोहित शर्माची नेटवर्थ किती?

Rohit Sharma Net Worth: भारताने चॅम्पियन ट्रॉफीतील अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाचा चार विकेटने पराभव केला. या संपूर्ण मालिकेत भारत एकही सामन्यात पराभूत झाला नाही. अंतिम सामन्यात हिटमॅन रोहित शर्मा हिरो ठरला. त्याने 83 चेंडूंत 76 धावा केल्या. त्यालाच सामनावीरचा पुरस्कार मिळाला. रोहित शर्मा फक्त मैदानातच नाही तर उत्पन्नाच्या बाबतीतही आघाडीवर आहे. त्याची नेटवर्थ आहे तरी किती?

214 कोटी संपत्तीचा मालक हिटमॅन

रोहित शर्मा भारती क्रिकेट नियामक मंडळाच्या A+ ग्रेडचा खेळाडू आहे. तो भारतीय संघाचा कर्णधारदेखील आहे. त्यामुळे त्याला बीसीसीआयकडून वर्षाला सात कोटी रुपये मानधन मिळते. तसेच एका कसोटी सामन्यासाठी 15 लाख रुपये, एकदिवशी सामन्यासाठी 6 लाख आणि T20 सामन्यासाठी 3 लाख रुपये मिळतात. रोहित शर्मा याला IPL मधून 16 कोटी रुपये मिळतात. क्रिकेटमधून मिळणारे उत्पन्न हे रोहित शर्माच्या कामाईचा मोठा भाग आहे.

रिपोर्ट्सनुसार त्याची संपत्ती 214 कोटी रुपये आहे. फक्त क्रिकेटमधून रोहितला 23 कोटी रुपये मिळतात. म्हणजेच त्याचे महिन्याचे उत्पन्न दोन कोटी रुपये जाते. तसेच इतर ब्रॅडच्या जाहिरातीचे उत्पन्न मिळवल्यावर ही कमाई त्यापेक्षा जास्त आहे.

रोहित शर्माचा अनेक ब्रँडसोबत करार

रोहित शर्मा क्रिकेटबरोबर इतर कंपन्यांच्या जाहिरातीमधून उत्पन्न मिळवतो. तो अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत कंपन्यांचा ब्रँड अंबेसेडर आहे. त्यात CEAT, Rasna, Oral-B, Swiggy, Ixigo, Max Life Insurance, New Era, Aristocrat आणि IIFL यासारख्या कंपन्या आहेत.

रोहित शर्मा गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळवत आहे. त्याने अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक जवळजवळ 90 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. त्याच्या इन्वेस्टमेंट पोर्टफोलियोमध्ये Rapidobotics, Veiroots Wellness Solutions यासारखे स्टार्टअप आहे. तसेच तो मुंबईत एक क्रिकेट एकेडमी CricKingdom चालवतो. त्याने मुंबईत फ्लॅट घेऊन ते भाड्याने दिले आहे. त्यातूनही त्याला लाखोंचे उत्पन्न मिळते.

हे ही वाचा…


रोहित शर्मा याला मैदानात झाले काय? टेन्शनमध्ये आली पत्नी रितिका अन् मुलगी

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“बाळा” म्हणत आयफाच्या कार्यक्रमात शाहरुखची श्रेयाला मिठी अन्… व्हिडीओने चाहत्यांची मने जिंकली “बाळा” म्हणत आयफाच्या कार्यक्रमात शाहरुखची श्रेयाला मिठी अन्… व्हिडीओने चाहत्यांची मने जिंकली
राजस्थानच्या जयपुरमध्ये नुकतेच सगळे बॉलिवूड सेलिब्रिटी IIFA Awards 2025 मध्ये दिसले. 8 मार्च पासून सुरु झालेला हा पुरस्कार सोहळा 9...
भूपेश बघेल यांच्या घरावर ईडीचा छापा, संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांवरच काढला राग
महाझुटी सरकारचा स्वप्नदर्शक आणि बोगस अर्थसंकल्प; आदित्य ठाकरे यांचा घणाघात
ही लोकशाही नाही तर एक ढोंग आहे, कपिल सिब्बल यांचा केंद्र सरकारवर निशाणा
Maharashtra Budget 2025 : सरकारने निराशा केली, सभगृहात आवाज उठवणार – उत्तम जानकर
ऑनलाईन वेट लॉस प्लान जीवावर बेतला, डाएटच्या अतिरेकामुळे 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र, शेतकरी आणि लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा अर्थसंकल्प; अंबादास दानवेंची टीका