Good bye 2024: जाणून घ्या मनोरंजन क्षेत्रात प्रेक्षकांनी कशाला दिली पसंती
नावीन्यपूर्ण कथाकथन, अर्थपूर्ण उपक्रम आणि प्रेरणादायी विषयांवर भाष्य करण्याबद्दलची बांधिलकी जपल्यामुळे मनोरंजन क्षेत्रामध्ये प्रेक्षकांनी विविध कार्यक्रमांना पसंती दिली. मनोवेधक प्रीमियर्सपासून विचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या अभियानांपर्यंत विविध कार्यक्रम राबवल्यामुळे ज्ञान आणि मनोरंजनाचा स्तर उंचावला आहे.
प्रेक्षकांनी मनोरंजन क्षेत्रात 2024 या वर्षामध्ये सोनी बीबीसी अर्थला पसंती दिली. ‘प्लॅनेट अर्थ III’, ‘मॅमल्स’ आणि ‘इन्साइड द ऑटिस्टिक माइंड’ हे सोनी बीबीसी अर्थ या वाहिनीवर यावर्षी सादर झालेले मुख्य प्रीमियर होते. सर डेव्हिड अॅटनबरो यांनी निवेदन केलेल्या ‘प्लॅनेट अर्थ III’ मध्ये निसर्गातील सौंदर्य आणि नाट्य यांचे चित्रण प्रेक्षकांना पहायला मिळाले, तर ‘मॅमल्स’ हा शो प्रेक्षकांना सस्तन प्राण्यांच्या अद्भुत जगाची सैर करून देणारा ठरला. त्याच बरोबर सातत्याने बदलणाऱ्या आपल्या ग्रहाचे चित्र सुद्धा मॅमल्स या शो च्या माध्यामातून दाखवण्यात आले. ‘इन्साइड द ऑटिस्टिक माइंड’ ही मालिका ऑटिझम विषयी जागरूकता करण्याच्या उद्देशाने प्रसारित करण्यात आली होती. ऑटिझम या विकाराने ग्रासलेल्या व्यक्तींच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी सहानुभूती किती महत्वाची भूमिका बजावते, हे या मालिकेच्या माध्यमातून दाखवण्यात आले.
सोनी BBC अर्थने आपल्या प्रेक्षकांपर्यंत काही अर्थपूर्ण उपक्रम घेऊन येण्याची परंपरा चालू ठेवत फोटोग्राफी स्पर्धेच्या चौथ्या आवृत्तीची ‘अर्थ इन फोकस’ ची सुरुवात केली. ‘वन वर्ल्ड, मेनी फ्रेम्स’ हा या स्पर्धेचा विषय होता. प्रत्यक्ष जीवनातील नायकांनी केलेल्या अलौकिक कामगिरीला मान्यता देत, सोनी BBC अर्थच्या ‘अर्थ चॅम्पियन्स’चे रोचक तीन मिनिटांच्या कॅप्सूलमध्ये रूपांतर करण्यात आले. 2024 मध्ये या वाहिनीवरून घोषित झालेले अर्थ चॅम्पियन्स आहेत. आनंद मल्लिगावड (द लेकमॅन ऑफ इंडिया), उमा मणी (द कोरल वूमन ऑफ इंडिया), परमिता सरमा आणि मझीन मुख्तार (शाळेच्या फीसाठी प्लॅस्टिकचा उपयोग करण्याच्या कल्पनेबद्दल) आणि शान लालवाणी (बायोडिग्रेडेबल क्लीनिंग एजंट लॉन्च केल्याबद्दल).
अर्थपूर्ण चर्चेची परंपरा पुढे नेत सोनी BBC अर्थने आपल्या ‘फील अॅक्टिव्ह अवर्स’ या शाळा-संपर्क कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ‘मिशन झीरो वेस्ट चॅलेंज’ हा अनोखा उपक्रम सुरू केला. हे चॅलेंज शाळांना शाश्वत कचरा व्यवस्थापनात नेतृत्व करून, अधिक हरित आणि स्वच्छ भविष्यासाठीची वचनबद्धता दाखवून ‘मिशन झीरो वेस्ट चॅलेंज 2024’ जिंकण्यासाठी सक्षम करते. त्याच बरोबर या वाहिनीने ऑगस्टमध्ये, भारताच्या सांस्कृतिक समृद्धीवर भर देत ‘देसी फील्स’ हा शो प्रसारित केला होता. ज्यामध्ये ‘भारत-विशिष्ट’ शीर्षक असलेले कार्यक्रम सादर करण्यात आले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List