हॉटेलमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या, मुलाने दिली गुह्याची कबुली; वडीलही सहभागी
लखनऊमधील हॉटेलमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. 24 वर्षीय अर्शदने आलिया (9), अक्सा (16), अलशषिया (19) आणि हरमीन (18) या चार बहिणींसह आई आस्मा यांची हत्या केली. यात त्याचे वडील बदरुद्दीन यांनीही त्याला साथ दिली. अर्शदने गुह्यात वडिलांचाही सहभाग असल्याची कबुली दिली तसेच वडील आत्महत्या करण्यासाठी हॉटेलबाहेर पडल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
अर्शदने एक व्हिडीओ बनवला असून त्यात त्याने आपण केलेल्या गुह्याची कबुली दिली आहे. तो राहत असलेल्या परिसरातील लोक या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप त्याने केला. लोकांनी त्याला सातत्याने त्रास दिला. आवाज उठवूनही काहीच उपयोग झाला नाही. कडाक्याच्या थंडीत भटकत होतो, त्यामुळे बहिणी आणि आईचा खून केल्याचे त्याने म्हटले आहे.
पंतप्रधानांना पत्र पाठवून केली वस्तीतील लोकांची तक्रार
आई आणि चार बहिणींच्या हत्येपूर्वी अर्शदने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून परिसरातील लोकांची तक्रार केली होती. दुसऱयांच्या जमिनीवर आणि जागांवर कब्जा करणाऱया मुस्लिमांना सोडू नका. त्यांना कठोर शिक्षा करा, अशी विनंती त्याने पंतप्रधानांना केली होती. वस्तीतील लोकच आपले घर हिसकावून घेत आहेत. 10 ते 15 दिवसांपासून इतरत्र भटकत असून आई आणि बहिणींच्या हत्येला वस्तीतले लोकच जबाबदार असल्याचा आरोप त्याने केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List