उत्तर प्रदेशात दररोज 50 हजार गायींची कत्तल, अधिकाऱ्यांची खाबुगिरी सुरू; भाजप आमदाराचा घरचा आहेर
”गायींची कत्तल करण्याची कोणाचीही हिंमत नव्हती. आज आम्ही दुःखी असून आमच्या सरकारमध्ये दररोज 50 हजार गायींची कत्तल होत आहे. अधिकारी गायींचे पैसे खात आहेत. सगळी लूट सुरू आहे. या सर्वांचे प्रमुख मुख्य सचिव आहेत. त्यांनी माझी हत्या करण्याची तयारी केली आहे, 9 एमएमच्या 25 पिस्तूल खरेदी करण्यात आल्या आहेत”, असं वक्तव्य भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी केलं आहे. गाझियाबादमध्ये पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात पोलीस लाच घेत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यावरच भाष्य करताना ते असं म्हणाले आहेत.
आज एका आयोजित पत्रकार परिषदते नंदकिशोर गुर्जर म्हणाले की, गाझियाबाद पोलिसांमध्ये भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे. आमच्यापैकी अनेक आमदार मुख्यमंत्र्यांना भेटले, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना हटवण्याचे तीनवेळा आश्वासन दिले. मात्र आता अधिकारी मुख्यमंत्र्यांचे ऐकत नसल्याचे दिसून येत आहे, असं ते म्हणाले.
भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर म्हणाले की, ”गाझियाबादमध्ये पोलिसांमधील भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे. कोणतीही भीती न बाळगता पोलीस पैसे घेत आहेत. उत्तर प्रदेशात दररोज 50 हजार गायींची कत्तल होतंय. गायींच्या कत्तलीसाठीही पैसे घेतले जात आहेत.” ते म्हणाले की, ”मी इतर सहकारी आमदारांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. गाझियाबादचे पोलीस आयुक्त हटवण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी तीनदा दिले होते. मुख्यमंत्री हे चांगले असून ते आपला शब्द पाळणारे व्यक्ती आहेत. अधिकारी त्यांचे ऐकत नसल्याचे दिसून येत आहे.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List