रब्बी पिकांसाठी उजनीतून कालव्यांना पाणी सोडावे, युवासेनेचे आंदोलन
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून उजनी उजव्या आणि डाव्या कालव्याला रब्बी पिकांसाठी पाणी सोडावे, यासाठी युवासेनेच्या वतीने उजनी उजव्या कालव्यामध्ये जिल्हा युवा अधिकारी गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी गणेश इंगळे म्हणाले, ‘उजनीच्या पाण्यावर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, माढा, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ, अक्कलकोट आदी तालुक्यांमधील शेती मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. सध्या उजनी धरणामध्ये ९५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तरीदेखील अद्याप कालव्याला पाणी न सोडल्यामुळे त्याचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. जिल्ह्यातील साडेचार लाख हेक्टर क्षेत्रामध्ये सध्या रब्बी पीक आहे. परंतु, जिल्ह्यामध्ये रब्बी पिकांना पाणी नसल्यामुळे पिकांना मोठा फटका बसतोय. जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याचाही फटका शेतकऱ्यांना बसत असून, त्यामुळे उजनीतून येणारे पाणी थांबले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. रब्बी पिकांसाठी पाणी तत्काळ सोडावे अन्यथा युवा सेनेच्या वतीने उजनी धरणावर आठ दिवसांत जलसमाधी घेऊ,’ असा इशाराही इंगळे यांनी दिला.
याप्रसंगी गणेश काळे, भारत पराडे, लालासाहेब भोई, अशोक भोई माउली पराडे, अवी पराडे, ओम पराडे, सचिन इंगळे, मोनू इंगळे, विकास भोई, सिदू गायकवाड, सोमनाथ भोई, आदित्य भोई, दीपक भोई, अक्षय भोई आदी युवासैनिक उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List