बहिणींना पैसे देणार नसाल तर त्यांचे मतही परत द्या, संजय राऊत यांनी फटकारले

बहिणींना पैसे देणार नसाल तर त्यांचे मतही परत द्या, संजय राऊत यांनी फटकारले

विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता महायुती सरकारने लाडक्या बहिणींना मोठा धक्का देण्याची तयारी सुरू आहे. या सरकारी योजनेचे फायदे उकळण्यासाठी निकषांच्या बाहेर जाऊन अर्ज भरलेल्या महिलांचे अर्ज बाद करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे आता काही महिलांना यापुढे पैसै मिळणं बंद होणार आहे. त्यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी या योजनेत फार मोठा घोटाळा झाल्याचे म्हटले आहे.

मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांना पत्रकारांनी लाडकी बहिण योजनेबाबत विचारले. त्यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ”ही योजना म्हणजे लाडक्या बहिणी आणि सरकारमधला विषय आहे. आम्ही लाडक्या बहिणींमुळे जिंकलो असं सरकारचं म्हणनं आहे. त्यामुळे जर आता त्या बहिणींना पैसे देणार नसाल तर त्यांचे मतही परत द्या. हा फार गंभीर विषय आहे. यात फार मोठा घोटाळा झाला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

जो मित्र असतो त्याच्याच पाठीत वार करायचा हा भाजपचं धोरण

एनडीएत भाजप व नितीश कुमारांच्या जदयूत सारे काही आलबेल नसल्याचे समोर येत आहे. त्यावर प्रतिक्रीया देताना संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे. ”महाराष्ट्रात भविष्यात भाजप एकनाथ शिंदे व अजित पवारांसोबत निवडणूका लढणार नाहीत. बिहारमध्ये भाजपने तेच केले आहे. आता भाजप नितीश कुमार या एनडीएमधील मित्र पक्षाचेच दहा खासदार फोडण्याचे काम सुरू आहे. जो पक्ष एनडीएमध्ये आहेत त्यांचाच पक्ष फोडतायत त्यामुळे नितीश कुमार अस्वस्थ आहेत.

ट्रम्पच्या शपथविधीचे आमंत्रण नसल्याने मोदी अस्वस्थ

”ट्रम्प मोदींना शपथविधीला बोलवायला तयार नाही. ही त्यांची पत आहे. पराराष्ट्र मंत्री व्हाईट हाऊसच्या बाहेर बसून आणि उभे आहेत. नवाझ शरीफ, पुतीन, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष, सौदी गल्फमधील छोट्या देशांना आमंत्रण गेलंय पण विश्वगुरुंना आमंत्रण नाहीए. त्यांची आणि देशाची प्रतिष्ठा ढासळतेय. शपथविधीचे आमंत्रण नसल्याने विश्वगुरू अस्वस्थ आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“मीच कॅबिनेट..”; कंगना राणौत यांच्या ‘इमर्जन्सी’चा आणखी एक दमदार ट्रेलर “मीच कॅबिनेट..”; कंगना राणौत यांच्या ‘इमर्जन्सी’चा आणखी एक दमदार ट्रेलर
अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. अनेक अडथळ्यांना पार करत अखेर...
अखेर तो क्षण आलाच.. ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये एजे देणार प्रेमाची जाहीर कबुली?
“पुढच्या जन्मी माझे पती बनू नका..”, गोविंदाच्या पत्नीने जोडले हात; संसारात सर्वकाही आलबेल नाही?
तिरुपतीमध्ये भक्तांच्या समूहाला रुग्णवाहिकेची धडक, दोन महिलांचा मृत्यू; तीन जखमी
Photo – मराठमोळी अभिनेत्री अश्विनी चवरेचा बॉडीकॉन ड्रेसमध्ये ग्लॅमरस अंदाज
मध्य प्रदेशात मंदिरांच्या तोडफोडीवरून वातावरण तापले; सराफा बाजार बंद, हिंदू जैन समाजाचे आरोपप्रत्यारोप
गुंडांपासून लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका, शरद पवार यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र