न्यू इंडिया अॅश्युरन्स, स्टेट बँक ऑफ इंडियामधील भरतीसाठी प्रशिक्षण वर्ग, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाकडून आयोजन
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार न्यु इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेडमधील असिस्टंट पदासाठी आणि स्टेट बँक ऑफ इंडियामधील ज्युनियर असोसिएट्स या पदांसाठी होणाऱया भरतीसाठी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाकडून प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. आठ ते दहा दिवसांचे हे प्रशिक्षण वर्ग शिवसेना भवन येथे होणार आहेत.
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना सचिव, शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, महासंघ कार्याध्यक्ष विलास पोतनीस, सुनील शिंदे, महासंघ सरचिटणीस प्रदीप मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनी लिमिटेड आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये होणाऱया परीक्षेच्या पूर्वतयारीकरिता स्पर्धात्मक लेखी परीक्षेत जास्तीत जास्त उमेदवार यशस्वी व्हावेत यासाठी या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी आठ ते दहा दिवसांचा राहणार आहे. ज्या उमेदवारांना या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी नावनोंदणीसाठी शिवसेना भवन येथे सोमवार, 6 फेब्रुवारी 2025 ते 11 फेब्रुवारी 2025 पर्यंत श्री शरद एक्के, मोबाईल क्र. – 1892699215, श्रीराम विश्वासराव – 9869588469, विलास जाधव – 9619118999 यांच्याशी सायंकाळी 6 ते रात्रौ 8.30 या वेळेत रविवार व सुट्टीचे दिवस वगळून संपर्क साधावा, असे महासंघाचे संघटक सचिव व प्रशिक्षण वर्ग प्रमुख उमेश नाईक यांनी या पत्राद्वारे कळविले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List