पुण्याच्या पालकमंत्री पदावरुन शीतयुद्ध! पक्षनेतृत्व योग्य निर्णय घेईल – मुरलीधर मोहोळ

पुण्याच्या पालकमंत्री पदावरुन शीतयुद्ध! पक्षनेतृत्व योग्य निर्णय घेईल – मुरलीधर मोहोळ

पुण्याचा पालकमंत्री भाजपाचा की अजित पवार गटाचा यावरून सध्या दोन्ही पक्षांत शीतयुद्ध सुरू आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत कोणताही वाद नाही. आम्ही निवडणूक एकत्रित लढलो असून, कार्यकर्त्यांत समजदेखील आहे. त्यामुळे पक्षनेतृत्व जे निर्णय घेते, त्याची अंमलबजावणी करतात. मनपा निवडणुकीच्या जागांबाबत त्यावेळी निर्णय घेतला जाईल.

पुण्यातील भिडेवाडा येथे सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले दाम्पत्यास अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मोहोळ म्हणाले, देशातून दरवर्षी सव्वादोन कोटी भाविक शिर्डीला येतात. परंतु त्याठिकाणी विमानसेवा 24 तास तिथे सुरू नाही. नाईट लँडिंगचे काही प्रश्न होते.

सीआयएसएफ, एटीसी मनुष्यबळाचा विषय होता, त्यामुळे त्याबाबत मी बैठक घेऊन दोन ते तीन महिन्यांत सर्व प्रश्न मार्गी लागतील. तीन महिन्यांनंतर शिडींचे विमानतळ 24 तास सुरू राहील, असे नियोजन करण्यात आले आहे.

दावे, प्रतिदावे

पुण्याच्या पालकमंत्री पदावर अजित पवार गटाचा दावा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हेच पालकमंत्री होतील, असा दावा क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला आहे. जिल्ह्यात भाजपचे आमदार जास्त असल्याने त्यांनीदेखील पालकमंत्री पदासाठी फिल्डिंग लावून आहेत. त्यामुळे थेट दावा करण्याऐवजी पक्षाच्या नेत्यांवर हा विषय सोपवत आहेत. सध्यातरी पालकमंत्री पदावरून दावे-प्रतिदावे सुरू आहेत.

पुरंदर विमानतळासाठी मुंबईत होणार बैठक

पुरंदर विमानतळबाबत जागा निश्चित झाली आहे. रविवारी राज्यातील सर्व विमानतळांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईत बैठक पार पडणार आहे. केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीदेखील बैठक मुंबईत होणार असून, त्यात पुण्यातील पुरंदर विमानतळाचा प्रश्न असणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“21 लाखांचं बक्षीस देईन जर मुलीच्या बॉयफ्रेंडला..”; बिग बॉसच्या निर्मात्यांना चाहत पांडेच्या आईचं खुलं आव्हान “21 लाखांचं बक्षीस देईन जर मुलीच्या बॉयफ्रेंडला..”; बिग बॉसच्या निर्मात्यांना चाहत पांडेच्या आईचं खुलं आव्हान
‘बिग बॉस’चा अठरावा सिझन चांगला चांगलाच गाजतोय. सूत्रसंचालक सलमान खानचा हा सर्वांत वादग्रस्त रिअॅलिटी शो त्यातील हाय-व्होल्टेज ड्रामासाठी सतत चर्चेत...
अभिनेत्रीने लेकींसाठी सोडली मायानगरी; मुंबईपासून दूर ‘या’ ठिकाणी करतेय संगोपन, सांगितलं खास कारण
सतत रडत बसायची गरज काय? ‘बिग बॉस 18’मधील शिल्पा शिरोडकरबद्दल काय म्हणाल्या वर्षा उसगांवकर?
श्वास कोंडतो, बर्ड फ्ल्यू सारखी लक्षणं… चीनमधील HMPV डेंजर व्हायरसची लक्षणे काय?; जाणून घ्या, सतर्क व्हा
बंगळुरूत HMPV चा पहिला रुग्ण, आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी
सावधान… लहान मुलं आणि ज्येष्ठांनाच या व्हायरसची लागण, चीनच्या खरतनाक HMPV भारतात एन्ट्री, पहिला रुग्ण सापडला
अनियंत्रित बस दरीत कोसळली, चार प्रवाशांचा मृत्यू; अनेक जण जखमी