Santosh Deshmukh Case – सुदर्शन घुलेसह तिन्ही आरोपींना 14 दिवसांची CID कोठडी
बीड जिह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी गेल्या 25 दिवसांपासून फरार असलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना अटक करण्यात आली आहे. यानंतर आज या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजार करण्यात आलं. यावेळी केज न्यायालयाचे प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एस व्ही पावसकर यांनी या तिन्ही आरोपींना 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसआयटीच्या पथकाने बालेवाडीत फरार आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे याला अटक केली. याशिवाय आरोपींना मदत करणाऱ्या डॉ. संभाजी वायभसे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. असं असलं तरी अद्याप आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे मात्र फरार आहे. दरम्यान, पोलिसांनी या हत्येतील सातपैकी सहा जणांना अटक केली आहे. पोलिसांनी यापूर्वी जयराम माणिक चांगे (21), महेश सखाराम केदार (21), प्रतीक घुले (24) आणि विष्णू चाटे (45) यांना अटक केली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List