सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर नंदीध्वज मार्गाची पाहणी

सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर नंदीध्वज मार्गाची पाहणी

श्री सिद्धरामेश्वर यात्रेचा नंदीध्वज मार्ग पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. त्याची सुरुवात आज नंदीध्वजाचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्या वाड्यापासून यात्रेचे मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू यांनी पोलीस आयुक्त एस. राजकुमार, सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

 प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीदेखील 12 ते 16 जानेवारी यादरम्यान सिद्धेश्वर यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. 12 जानेवारीपासून यात्रेला 68 लिंगांना तैलाभिषेक केला जाणार असून, या दिवशी मानाच्या सात नंदीध्वजांची मिरवणूक काढून श्री सिद्धेश्वर यात्रेस सुरुवात करण्यात येणार आहे.

सोलापूर शहरात श्री सिद्धरामेश्वरांच्या नदीध्वजांची मिरवणूक मोठ्या प्रमाणात निघत असून, त्या अनुषंगाने यात्रेच्या काळात शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात येईल, तसेच यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलीस आयुक्तालयाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाईल, अशी ग्वाही पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी यावेळी दिली. तसेच महापालिकेच्या वतीने मिरवणूक मार्गातील रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, विद्युत दिवे चालू स्थितीत ठेवणे, आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात हॅलोजन लावणे, मिरवणूक मार्गातील रस्त्यांवरील अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे, श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेले ६८ लिंग येथील परिसर व मिरवणूक मार्गातील रस्त्यांची साफसफाई करून जंतुनाशक फवारणी इत्यादी कामे सुरू करण्यात आली आहेत.

यात्रेदरम्यान महापालिका प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली. तर, यात्रेच्या पूर्वी प्रशासनाकडून सर्व कामे पूर्ण केली जातील, अशी अपेक्षा व्यक्त करताना, यात्रेचे मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू म्हणाले, ‘पोलीस आयुक्तालय आणि सोलापूर महापालिकेकडून यात्राकाळात मोलाचे सहकार्य लाभते. असे सहकार्य यंदाच्या वर्षीदेखील मिळेल,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी पोलीस उपायुक्त विजय कबाडे, दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त शिरडकर, शशिकांत भोसले, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, विभागीय अधिकारी अविनाश अंत्रोळीकर, हिदायत मुजावर, विद्युत विभागाचे राजेश परदेशी, उद्यान अधिकारी किरण जगदाळे, सफाई अधिकारी अनिल चराटे, बिपीन धुम्मा, जयप्रकाश आमणगी आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“21 लाखांचं बक्षीस देईन जर मुलीच्या बॉयफ्रेंडला..”; बिग बॉसच्या निर्मात्यांना चाहत पांडेच्या आईचं खुलं आव्हान “21 लाखांचं बक्षीस देईन जर मुलीच्या बॉयफ्रेंडला..”; बिग बॉसच्या निर्मात्यांना चाहत पांडेच्या आईचं खुलं आव्हान
‘बिग बॉस’चा अठरावा सिझन चांगला चांगलाच गाजतोय. सूत्रसंचालक सलमान खानचा हा सर्वांत वादग्रस्त रिअॅलिटी शो त्यातील हाय-व्होल्टेज ड्रामासाठी सतत चर्चेत...
अभिनेत्रीने लेकींसाठी सोडली मायानगरी; मुंबईपासून दूर ‘या’ ठिकाणी करतेय संगोपन, सांगितलं खास कारण
सतत रडत बसायची गरज काय? ‘बिग बॉस 18’मधील शिल्पा शिरोडकरबद्दल काय म्हणाल्या वर्षा उसगांवकर?
श्वास कोंडतो, बर्ड फ्ल्यू सारखी लक्षणं… चीनमधील HMPV डेंजर व्हायरसची लक्षणे काय?; जाणून घ्या, सतर्क व्हा
बंगळुरूत HMPV चा पहिला रुग्ण, आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी
सावधान… लहान मुलं आणि ज्येष्ठांनाच या व्हायरसची लागण, चीनच्या खरतनाक HMPV भारतात एन्ट्री, पहिला रुग्ण सापडला
अनियंत्रित बस दरीत कोसळली, चार प्रवाशांचा मृत्यू; अनेक जण जखमी