Latur News – 5 लाख 55 हजार रुपयांचा गुटखा जप्त

Latur News – 5 लाख 55 हजार रुपयांचा गुटखा जप्त

शासन प्रतिबंधीत गुटखा,पानमसाला,सुगंधित तंबाखूची बेकायदेशिररीत्या वाहतूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडील 5 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध चाकूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

सहायक पोलीस अधीक्षक अधिकारी बी.चंद्रकांत रेड्डी यांना मिळालेल्या माहितीवरून अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 2 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पथकातील श्रीमंत आरदवाड, दिपक सोनकांबळे, सिराज शेख, जळबा देगावे, बाबासाहेब गुळवे यांनी तालुक्यातील उदगीर-नळेगाव रस्त्यावरील घरणी पुलावर पोलीस बंदोबस्त लावला. अकराच्या सुमारास (एमएच 2 बीझेड 5721) ही कार आली. कारमध्ये तीन लोक होते. पोलीस पथकाने त्यांची चौकशी केली व पंचासमक्ष कारची झडती घेतली असता त्यात विविध कंपनीचे पानमसाल्याचे डबे आढळून आले. शासन प्रतिबंधीत गुटखा,पानमसाले,सुगंधी तंबाखू वाहतूक करणाऱ्या मुकेश वाल्मीक लहाने, मनीष शंकरप्रसाद शुक्ला,निखिल मोरेश्वर घोडके हे सर्व वेगवेगळ्या गावाचे रहिवासी असून सध्या लातुर येथे राहत आहेत. यांना ताब्यात घेऊन यांच्याकडून मोबाइल व कारसह 5 लाख 55 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजेश घाडगे करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अखेर सुरेश धस यांची तलवार म्यान, त्या वक्तव्याबद्दल दिलगिरी; म्हणाले ‘मी अजितदादांसाठी डोक्यात दगडं…’ अखेर सुरेश धस यांची तलवार म्यान, त्या वक्तव्याबद्दल दिलगिरी; म्हणाले ‘मी अजितदादांसाठी डोक्यात दगडं…’
सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, हे प्रकरण आता चांगलंच तापलं आहे, या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपाला...
खव्वय्यांसाठी गोड बातमी, मुंबईच्या बाजारात कोकणातील आंबा दाखल
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये मोठा धोका टळला, सारख्या नंबर प्लेटच्या दोन गाड्या आल्या अन्…
‘रामायण’मधल्या उर्मिलाचा मॉडर्न अंदाज; 38 वर्षांनंतर बदलला इतका लूक, ओळखणंही कठीण
अनेक फ्लॉप चित्रपट,रणबीरसोबतचा सिनेमा नाकारला, खासदाराशी लग्न केलं; बॉलिवूड अभिनेत्रीचं पुन्हा कमबॅक
HMPV Virus पासून सुरक्षित राहण्यासाठी काय कराल? नाकापासून फोनपर्यंत खबरदारी काय?
धोक्याची घंटा… चीनचा व्हायरस कर्नाटकापाठोपाठ गुजरातमध्ये, तीन रुग्णांना लागण