सूरत विमानतळावर CISF जवानानं संपवलं जीवन, सर्व्हिस रायफलमधून स्वतःवर झाडली गोळी
सूरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर तैनात असलेल्या सीआयएसएफ जवानाने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवल्याची घटना शनिवारी घडली. किशन सिंग असे मयत जवानाचे नाव आहे. किशन विमानतळावरील वॉशरुममध्ये स्वतःच्या सर्व्हिस रायफलमधून शनिवारी दुपारी 2.10 च्या सुमारास गोळी झाडली. किशनने आत्महत्या का केली याबाबत अद्याप समजू शकले नाही. पोलीस याबाबत सखोल तपास करत आहेत.
किशन मूळचा जयपूरचा रहिवासी असून तो सूरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर तैनात होता. शनिवारी कर्तव्यावर असताना अचानक किशन विमानतळावरील वॉशरुममध्ये गेला आणि सर्व्हिस रायफलमधून स्वतःच्या पोटात गोळी झाडली. त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याचे पोलीस निरीक्षक एन.व्ही. भारवाड यांनी सांगितले.
किशनने नेमक्या कोणत्या कारणातून टोकाचे पाऊल उचलले हे अद्याप समजू शकले नाही. अद्याप सीआयएसएफने याबाबत प्रतिक्रिया दिली नाही. तपासाअंती सत्य समोर येईल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List