महत्त्वाचे: भ्रष्टाचार उघड केला म्हणून पत्रकाराची हत्या
छत्तीसगडमधील बस्तर येथे पत्रकार मुकेश चंद्राकर (33) यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ते दोन दिवसांपासून बेपत्ता होते. शुक्रवारी त्यांचा मृतदेह सेप्टिक टँकमध्ये आढळून आल्याने एकच खळबळ माजली. निर्भीड, स्वतंत्र पत्रकार अशी त्यांची ओळख होती. रस्त्याच्या कामात झालेला भ्रष्टाचार उघड केल्यामुळे मुकेश यांची हत्या झाली असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे त्याच रस्त्याच्या बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या टँकमध्ये मृतदेह आढळल्याने संशय आणखी बळावला. पोलिसांनी चौकशीसाठी अनेकांना ताब्यात घेतले आहे.
मांजर लपवून ठेवल्याच्या रागातून मुलीला चटके
मुंबई – घरात पाळलेले मांजर लपवून ठेवले म्हणून संतापलेल्या महिलेने 5 वर्षांच्या मुलीच्या उजव्या पायावर गरम पक्कडीचे चटके दिले. इतक्यावरच न थांबता मुलीच्या डोक्यात लोखंडी पक्कड मारून दुखापत केल्याचा संतापजनक प्रकार गोवंडीच्या शिवाजीनगरात घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या क्रुर महिलेला अटक केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List