सौरव गांगुलीच्या मुलीचा कोलकात्यात अपघात, खासगी बसने दिली कारला धडक
हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची मुलीगी सना गांगुलीचा अपघात झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळच्या वेळेत भरधाव खासगी बसने सना गांगुलीच्या कारला धडक दिल्याने हा अपहात घडला आहे. सुदैवाने या सना गांगुलीला कोणतीही दुखापत झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलकत्याच्या डायमंड हार्बर रोडवर हा अपघात घडला आहे. शुक्रवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास एका खासगी बसने सना गांगुलीच्या कारला जोरदार धडक दिली. यावेळी सना कार ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसली होती. अपघात होताच बस ड्रायव्हरने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, यावेळी कारचालकाने त्या बसचा पाठलाग करून साखेर बाझार रोडवर त्याला अडवले.
दरम्यान, गांगुली कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रार मिळाल्यानंतर, अपघाताची माहिती मिळाताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून बस चालकाला ताब्यात घेतले. या अपघातात सना गांगुलीला दुखापत झाली नसून तिची तब्येत आता स्थिर आहे. तसेच पोलीस सध्या या अपघाताबाबात पुढील तपास करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List