देशमुख कुटुंबीयांना धमक्या दिल्या तर धनंजय मुंडेला रस्त्याला फिरू देणार नाही; मनोज जरांगेंचा थेट इशारा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणी मुख्य आरोपी वाल्मीक कराडला अटक झाल्यानंतर आता या प्रकरणाच्या तपासाबाबत आणि दबावाबाबत संशय व्यक्त होत आहे. आता याप्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी थेट मंत्री धनजंय मुंडे यांना थेट इशारा दिला आहे. धनंजय देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबीयांना जर धक्का बसला तर घरात घुसून मारू असा शेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला. मी आतापर्यंत धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं नाही, देशमुख कुटुंबीयांना जर त्रास झाला तर त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही असाही इशाराही त्यांनी दिला. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील दोषींना शिक्षा व्हावी या मागणीसाठी परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी मनोज जरांगे यांनी हा इशारा दिला आहे.
संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांसाठी न्याय मागितल्यानंतर आम्ही जातीयवादी कसे काय? असा सवालही जरांगे यांनी विचारला. देशमुख कुटुंबीयांना धमक्या देण्यात येत आहे. त्यांचा भाऊ न्यायासाठी लढतोय, वणवण फिरतोय. त्याला तुम्ही धमक्या देताय. संतोष भैयाचे भाऊ जेव्हा पोलिस ठाण्यात गेले तेव्हा त्यांना धमकावण्यात आले. यापुढे जर त्यांचे कुटुंब आणि कुणाला धक्का लागला तर धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर लक्षात ठेवा. परळी असो की बीड, इथल्या समाजाला ही त्रास झाला तर घरात घुसून मारायचे. देशमुख कुटुंबीयांच्या मागे सगळा मराठा समाज आहे. आम्ही फक्त कायद्याला मानतो, म्हणून आम्ही शांत आहोत. सगळे आरोपी पकडले जातील, फासावर जातील असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे, असेही जरांगे म्हणाले.
माझ्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या. न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. दोषींना मोक्का लागला पाहिजे. आकाच्या आकाला तुरुंगात जावं लागेल. आकाच्या आकाने जर काही केले तर तोही गेलाच समजा. ज्या पद्धतीने यांनी संतोषला मारले ती कोणती पद्धती? त्या लेकराने काय बिघडवले होते. फक्त एका दलित मुलाला वाचवायला गेला म्हणून त्याला असं मारलं, असेही जरांगे यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List