Santosh Deshmukh Case – सर्व आरोपींची नार्को टेस्ट करा, सरकारमधला मंत्री यांच्या पाठिमागे; मनोज जरांगे यांचा मोठा आरोप

Santosh Deshmukh Case – सर्व आरोपींची नार्को टेस्ट करा, सरकारमधला मंत्री यांच्या पाठिमागे; मनोज जरांगे यांचा मोठा आरोप

बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आज दोन आरोपींना अटक केली आहे. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक केली आहे. या प्रकरणी सर्व आरोपींची, सह आरोपींचीही नार्को टेस्ट करा. यांना फोन कोणी केले? स्वतःला वाचवण्याची यांना खून पचवायचा होता. तुमच्या मंत्रीपदासाठी लोकांचे लेकरं मारता का? सुट्टी नाही कोणाला. एका लेकराचा खून झाला हे यांच्यासाठी महत्त्वाचं नव्हतं. आरोपी सांभाळून ठेवणं हे यांच्यासाठी महत्त्वाचं होतं. इतके नालायकवृत्तीचे लोकसुद्धा राजकारणात आहेत, हे यातून सिद्ध झालं आहे, असा हल्लाबोल मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी केला आहे.

संतोष देशमुख यांची हत्या खंडणीमुळे झाली आहे. खंडणीवाला याला प्रामुख्याने जबाबदार आहे. यांनी ते केलं नसतं म्हणून त्यांनी खून करायला सांगितला. आरोपींच्या मोबाइलचे कॉल रेकॉर्डही पोलिसांकडे आले असतील. खंडणी आणि हत्या करणारे या सर्वांची नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे. कारण यात कोणत्या मंत्र्यानं, कोणत्या आमदारानं, सरकारमधला मंत्री आहे का एखाद दुसरा ज्याने यांना खंडणी मागायला आणि खून करायला बळं दिलं, हे समोर येणं गरजेचं आहे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.

100 टक्के सरकारमधले मंत्री याला खतपाणी घालत आहेत. कारण हे आरोपी इतके दिवस लपून राहताहेत. सुटून जाण्यासाठी हे काहितरी सामूहिक कट शिजवत आहेत. पोलिसांना हुलकावणी देण्याचा कट होतोय. या पाठिमागे सरकारमधला मंत्री, काही आमदार असायला पाहिजेत. तेच आरोपींना पळण्याचे आणि लपण्याचे सल्ले देत आहेत. इतक्या दिवसांनी अटक हो, पुण्यातच हो, असं सांगण्यात येत आहे. म्हणजे तुम्हाला पुण्याचं नाव बदनाम करायचं आहे का? बीडचं केलचं आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“मीच कॅबिनेट..”; कंगना राणौत यांच्या ‘इमर्जन्सी’चा आणखी एक दमदार ट्रेलर “मीच कॅबिनेट..”; कंगना राणौत यांच्या ‘इमर्जन्सी’चा आणखी एक दमदार ट्रेलर
अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. अनेक अडथळ्यांना पार करत अखेर...
अखेर तो क्षण आलाच.. ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये एजे देणार प्रेमाची जाहीर कबुली?
“पुढच्या जन्मी माझे पती बनू नका..”, गोविंदाच्या पत्नीने जोडले हात; संसारात सर्वकाही आलबेल नाही?
तिरुपतीमध्ये भक्तांच्या समूहाला रुग्णवाहिकेची धडक, दोन महिलांचा मृत्यू; तीन जखमी
Photo – मराठमोळी अभिनेत्री अश्विनी चवरेचा बॉडीकॉन ड्रेसमध्ये ग्लॅमरस अंदाज
मध्य प्रदेशात मंदिरांच्या तोडफोडीवरून वातावरण तापले; सराफा बाजार बंद, हिंदू जैन समाजाचे आरोपप्रत्यारोप
गुंडांपासून लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका, शरद पवार यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र